Home गडचिरोली मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या...

मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं:माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम

188
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0023.jpg

मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न
क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं:माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम
मूलचेरा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-
स्थानिक मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलेझरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ तथा वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी सामने मलेझरी येथील पटांगणात आयोजित करण्यात आले होते, त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं,राजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,त्यावेळी ते म्हणाले कब्बडी या खेळाने युवा स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ शकतो,मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला प्रत्येक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो,युवा वर्गाला सहकार्य करत असतो,क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं आणि युवा वर्गाने सामाजिक कार्यात सदैव समोर यावं मी आपल्या सोबत आहो माझ्या कडून मी सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन असे मत त्यांनी या वेळी दिले,तसेच मलेझरी या गावात युवा वर्गाला खेळण्यासाठी क्रीडा संकुल ची गरज आहे त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,महिला बचत गट च्या माध्यमातून सक्षम बनल्या पाहिजेत त्यासाठी सुध्दा प्रयत्न करीन असे मत त्यांनी यावेळी दिले .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बादल शहा जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष, प्रकाश दत्ता तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, बिधान वैद्य महामंत्री बंगाली आघाडी, सुभाष गणपती जिल्हा महासचिव, वामनराव कन्नके, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते,युवा नेते गणेश गारघाटे,प्रकाश कन्नके, गणेश बँकावार,दिवशे सर हे होते,
आज कार्यक्रमात मान्यवरांच् पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, सोबतच लहान मुलींचं नृत्य सादर करत राजे अमरीशराव आत्राम यांच्या स्वागत करण्यात आले, आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संदीप चौधरी, किशोर नेवारे, दीपक शेडमाके,आकाश आभारे, राहुल बावणे,वैभव चौधरी यांनी केलं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी,शालेय विद्यार्थी,कबड्डी खेळाडू उपस्थित होते.

Previous articleविकासाच्या नावाखाली लुटीचा डाव : संसाधनांच्या रक्षणासाठी एकत्र यावे
Next articleप्रथमच विस्वासानंतर चिंचवड विधानसभेला महिला अपक्ष उमेदवार आमदार म्हणून मिळणार का?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here