Home गडचिरोली दिभना येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार।

दिभना येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार।

148
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0043.jpg

दिभना येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : जिल्हा मुख्यालयापासुन जवळच असलेल्या दिभना येथे जंगल परिसरात बैल चराईसाठी नेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज मंगलवार 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.निलकंठ गोपाळा मोहुरले (55) असे मृतक इसमाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मृतक निलकंठ मोहुरले हा आपल्या इतर पाच साथिदारासह जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेला होता.दरम्यान दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केला असता या हल्यात निलकंठ मोहुरले ठार झाले घटनेची माहिती नवविभागाला देली.सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मागील वर्षी या परिसरात वाघाने धुमाकुळ माजवत अनेक नागरिकांच्या नरडिचा धोट घेतला होता.त्यादरम्यान वाघाला जेरबंद करण्यासाठी मोठे आंदोलनही करण्यात आले होते.आता सदर घटना घडल्याने नागरीक पुन्हा दहशतीत असुन वनविभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर घटनेबाबत गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये माहीती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here