Home विदर्भ मच्छी विक्री उघड्यावर कारवाईची मागणी         

मच्छी विक्री उघड्यावर कारवाईची मागणी         

260
0

राजेंद्र पाटील राऊत

मच्छी विक्री उघड्यावर कारवाईची मागणी                     (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बुलडाणा
पातुर्डा: येथील आठवडी बाजारात मच्छी विक्री उघड्यावर सुरू असल्याने स्थानिक व्यवसायिक अडचणीत आले आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी दिल्या असताना काहीच कारवाई निघत नसल्याने स्थानिक व्यावसायिकांनी सोशल मिडीया वर हा विषय मांडला आहे. सोमवारी 21फेब्रुवारी रोजी हा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
मटन व मच्छी मार्केट ला स्वतंत्र जागा देऊन रहदारीचा रस्ता व व्यावसायिक जागा मोकळी करावी अशी मागणी समोर आली आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने यात पुढाकार घेऊन दोन्ही व्यावसायिकांना न्याय देण्याची गरज आहे.
पातुर्डा येथील आठवडी बाजारात बहुतेक सर्वच उद्योग धंदे गजबजलेल्या जागेत चालतात. गायत्री नगर कडे जाणारा रस्ता मच्छी विक्री मुळे बंद पडला आहे. या ठिकाणी नाश्ता हाॅटेल्स, चहाची दुकाने, सलून व्यावसायिक आपापला व्यवसाय करतात. पण मच्छी च्या वासामुळे या भागात ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. यामुळे लहान सहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. स्थानिक सलून व्यावसायिक ज्ञानेश्वर अतकारे यांनी याप्रकरणी सोशल मिडीया वर विडीयो पोस्ट केला. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सलून व्यावसायिकांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र हा विषय निकालात निघाला नाही. यामुळे व्यावसायिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान ग्रामसचिव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सोमवार दि 21 फेब्रुवारी रोजी हा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

आमच्या दुकानासमोर मच्छी विक्री उघड्यावर सुरू असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे 26 ऑक्टोबर 21 रोजी तक्रार दिली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत ने काही कारवाई केली नाही. आमचे व्यवसाय बंद पडत असल्याने उपासमारीची पाळी आली आहे.
-ज्ञानेश्वर अतकारे
सलून व्यावसायिक पातुर्डा

Previous articleमहाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संगितराव भोंगळ
Next articleयेवती शिबिरातुंन ३८ मोतीबिंदु रुग्णांचे झाले ऑपरेशन. ▪️ गरिब व गरजू रुग्णांना मोफत शिबिरांचा झाला मोठा लाभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here