Home बुलढाणा काकनवाडा खुर्द येथील गुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचांसह दोशींवर कारवाई करिता चालू...

काकनवाडा खुर्द येथील गुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचांसह दोशींवर कारवाई करिता चालू असलेल्या उपोषणाची नवव्या दिवशी लेखी आश्वासनाने सांगता.

95
0

आशाताई बच्छाव

IMG-20231012-WA0075.jpg

काकनवाडा खुर्द येथील गुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचांसह दोशींवर कारवाई करिता चालू असलेल्या उपोषणाची नवव्या दिवशी लेखी आश्वासनाने सांगता.

युवा मराठा न्यूज नेटवर्क
ब्युरो चीफ बुलढाणा

संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथील गुरांचा गोठा या योजनेतील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सरपंच व सचिव यांचे सह दोशींवर कारवाई करणे बाबत दिनांक 3 ऑक्टोंबर2023 पासून मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या सहकार्याने नंदकिशोर दयाराम आढाव यांनी चालू केलेल्या उपोषणाची दखल घेत बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत काकनवाडा खुर्द येथील सरपंच गोपाल आढाव व त्यांचे भावाने महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजने अंतर्गत गुरांच्या गोट्याचा लाभ सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून घेतला गुरांचा गोठा व इतर भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपा प्रकरणी सखोल चौकशी करीता नेमण्यात आलेल्या समितीकडून तसेच गटविकास अधिकारी यांनी अखेर नव्या दिवशी दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी उपोषणकर्त्यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन येत्या 13 ऑक्टोबर रोजी चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येईल व तसा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल
अशे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले असून गटविकास अधिकारी माधव पायघन तसेच पी एसआय दिपक सोळंके, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अरुणभाऊ निंबोळकार यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले असून तक्रारीप्रमाणे चौकशी होऊन दोषीवर कारवाई न झाल्यास पुन्हा शांततेच्या मार्गाने न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेऊ असे उपोषणकर्त्त्यांनी सांगितले तसेच प्रथमच संग्रामपूर तालुक्यात नऊ दिवसांपासून चालू असलेल्या या उपोषणाला जिल्हाभरातून विविध पक्षाच्या प्रमुख नेते मंडळीने उपोषण मंडपाला भेटी दिल्या हे विशेष असून यावेळी उपोषणकर्त्यांसह काकनवाडा खुर्द येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous articleदेगलूर महाविद्यालयातील खेळाडुंना विद्यापीठीय मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक..
Next articleचाळीसगावात खाजगी शिकवणीप्रकरणी संस्थांना शिक्षण विभागाच्या नोटीसा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here