Home जळगाव चाळीसगावात खाजगी शिकवणीप्रकरणी संस्थांना शिक्षण विभागाच्या नोटीसा

चाळीसगावात खाजगी शिकवणीप्रकरणी संस्थांना शिक्षण विभागाच्या नोटीसा

92
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-071133_Google.jpg

चाळीसगावात खाजगी शिकवणीप्रकरणी संस्थांना शिक्षण विभागाच्या नोटीसा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरात गेल्या अनेक वर्षापासून खाजगी शिकवण्यांचे पेव फुटले असून शासकीय पगार मिळूनही शिक्षक शिकवण्या घेत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या आमसभेत देखील खाजगी शिकवण्या सर्रास घेतल्या जात असल्याची तक्रार आली होती.ही तक्रार गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने शहरातील पाच शाळांना नोटीसा पाठवल्या असून तुमच्या शाळेतील शिक्षक शिकवण्या घेतात की नाही असे हमीपत्र या शिक्षकांकडून भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत.शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शहरातील खाजगी शिकवण्यांना घेणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणानले आहे.
चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात अनेक वर्षापासून शिकवण्या घेत असल्याची चर्चा आहे
हजारो रूपये फी देवूनही आपल्या पाल्यास शिकवणी लावण्याची वेळ पालकांवर आली आहे ही बाब अत्यंत चिंतनीय आहे.खाजगी शिकवण्या घेणारे शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नाहीत काय असे यातून सिद्ध होत अशी देखील चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या आमसभेत खाजगी शिकवणीसंबंधी तक्रार करण्यात आली होती.या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यंाना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी शहरातील मान्यताप्राप्त 5 ते 7 शाळांना नोटीसा बजावल्या असून तुमच्या शाळेतील शिक्षक खाजगी शिकवण्या घेतात काय किंवा न घेत असल्याबाबत सर्व शिक्षकंाकडून हमीपत्र तातडीने भरून देण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यामुळे शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांवर आता या संस्था काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलेले आहे.हे हमीपत्र भरून देखील एखादा शिक्षक खाजगी शिकवणी घेतांना आढळून आल्यास आरटीई कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here