Home गडचिरोली गडचिरोली पोलीस भरतीत ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देवून...

गडचिरोली पोलीस भरतीत ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देवून भरती प्रक्रिया राबवा.

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_065057.jpg

गडचिरोली पोलीस भरतीत ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देवून भरती प्रक्रिया राबवा.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी

गृह विभागाचे सचिव व पोलीस महासंचालक यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

उमेदवारांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना याबाबत दिले होते निवेदन                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फत २०२३-२४ करिता ७४२ जागांसाठी पोलिस भरती प्रकिया राबविण्यात येत असून यात ई. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकही जागा नसल्याने ही भरती प्रक्रिया राबवताना शासनाने दिलेल्या ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील आरक्षणाप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊन भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

पोलीस दलामार्फत २०२३-२४ च्या या भरती प्रक्रियेत एकूण ७४२ जागा आरक्षित केल्या असून त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकही जागा नाही , तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी उमेदवारांसाठी ही एकही जागा नाही. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करण्याऱ्या इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे निवेदन निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले होते. त्यावेळी आमदार महोदयांनी उमेदवारांना उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन न्याय मागून देण्यासंदर्भात आश्वासन दिले होते आपल्या आश्वासनांची पूर्तता करीत आजच या सर्व उमेदवारांना घेऊन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेत सदर मागणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे गृह विभागाचे सचिव व पोलीस महासंचालक यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Previous articleएकलव्य संघटनेचे पोलिसांना निवेदन
Next articleकचरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here