• Home
  • नांदेड शहरालगत असलेल्या विशालनगर, फरांदेनगर भागातील अस्वच्छता व दुर्घंधीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात –

नांदेड शहरालगत असलेल्या विशालनगर, फरांदेनगर भागातील अस्वच्छता व दुर्घंधीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात –

नांदेड शहरालगत असलेल्या विशालनगर, फरांदेनगर भागातील अस्वच्छता व दुर्घंधीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात –
नांदेड, दि. १८ ; राजेश एन भांगे

नांदेड शहरालगत असलेल्या उत्तर नांदेड मतदार संघातील वाडी (बु.) नांदेड येथील च नागरी वसाहत विशालनगर, फरांदेनगर भागातील वासाहतीत गेल्या काहि वर्षा पासुन नव्या मोठ – मोठ्या ईमारती उभ्या करण्यासाठी ग्रामपंचायती कडून( मान्यता ) परवानगी देण्यात आली.
मात्र त्याच अनुशंगाने कोणत्याही प्राथमिक अत्यावश्यक नागरी सोई सुविधा अद्याप पर्यंत देण्यात आले नाहीत. तरीहि बय्राच धनदांडग्यानी, उच्य वर्णियांनी कमी दरात प्लाॕट्स खरेदि करून वाढीव किमंतीने विकण्याच्या उद्देशाने आपले प्लाॕट्स मोकळेच ठेवल्याने त्या प्लाॕट्सच्या अजुबाजुस असलेल्या अपार्टमेंट (फ्लाट) मधील नागरिक सोईस्कर पणे आपला केरकचरा त्या रिकाम्या प्लाॕट मध्येच टाकत असुन त्यामुळे परिसरात डुक्करांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच (भरीस भर म्हणून ) पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी सुद्धा या रिकाम्या प्लाॕट मध्ये मोठ्या प्रमाणात जमत आहे. व साचलेले पाणी वाहुन जाण्यासाठी कोणतेही मार्ग नसल्यामुळे या रिकाम्या प्लाॕटसनां डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
व त्यामुळे उत्पन्न झालेल्या डासांचा व दुर्घंधिचा या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी पावसाळ्याच्या दिवसात साचलेले पाणी व कचय्रामुळे व डास व दुर्घंधि चे प्रादुर्भाव हल्ली वाढतच चालल्याने येथील परिसरातील सर्व साधारण सामान्य नागरिकांना आपले जीवा मुठीत धरून जगावे लागत आहे.
त्यामुळे ग्रामपंचायती च्या वतिने रिकाम्या प्लाॕट धारकांना बांधकाम करणे, किंवा प्लाॕट मध्ये स्वयं स्वच्छता ठेवण्या बाबद सक्तीचे नोटिस बजावने अत्यावश्यक बनले आहे.
तसेच ग्रामपंचायती कडून ज्या पद्धतीने बय्राच वर्षा पासुन बांधकाम परवणग्या देण्यात आल्या आहेत त्याच ( तोडिस ) पार्श्वभूमीवर वासाहती अंर्तगत नाल्या, रस्ते व विधुत पोल ईत्यादि नागरी सुविधा पण देणे तितकेच गरजेचे असताना मात्र
तसे काहि हालचाल होताना दिसुन येत नाहि.
तरी सदर प्रकरणी गांभिर्य पुर्वक ग्रामपंयात व संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष्य घालून प्रश्न मार्गी लावावे अन्यथा कोरोना महारोगा प्रमाणेच इतर (डेंगु) व कोणते फ्लु सारख्या महारोगास येथील नागरिकांना बळी पडावे लागेल अशी भीती निर्माण होत असुन त्याचे शेवट फार वाईट होईल असा इशारा व सुचना येथील स्थानिक नागरिकांनी दिले आहे.

anews Banner

Leave A Comment