Home विदर्भ महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संगितराव भोंगळ

महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संगितराव भोंगळ

59
0

राजेंद्र पाटील राऊत

महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संगितराव भोंगळ
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
वानखेड-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोदावरी फाऊंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या महाआरोग्य शिबीराचा सर्वच रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांनी केले.
संग्रामपुर तालुक्यातील वानखेड[दुर्गादैत्य] येथे दि.२५ फेब्रु.रोजी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हे शिबीर आयोजित केले आहे.
या शिबीरात हृदयरोग तपासणी,२० इको ईसीजी,शुगर तपासणी,नाक-कान-घसा यासह महिलांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी तसेच मोतीबिंन्दुची शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगांव खा. यांचे पुढाकारातुन आयोजित शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संगितराव भोंगळ यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here