Home विदर्भ गडचिरोली येथील धान्य गोडाऊन मध्ये सापडलेल्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाची सखोल चौकशी करून...

गडचिरोली येथील धान्य गोडाऊन मध्ये सापडलेल्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा.—- महेंद्र ब्राम्हणवाडे

280
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली येथील धान्य गोडाऊन मध्ये सापडलेल्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा.—- महेंद्र ब्राम्हणवाडे

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):/ गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या मार्फतीने शासन चांगल्या प्रतीचे तांदूळ पुरवितो परंतु काही तांदूळ माफिया यात भेसळ करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार करतात आज देसाईंगंज वडसा भागातील भात गिरणीतून जुने तांदूळ मिलावट करून काही ट्रक गडचिरोली येथील पंचायत समिती जवळील गोडाऊन मध्ये उतरवीत असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना मिळताच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवून गोडाऊन मध्ये रंगेहाथ ट्रक मधून तांदुळ काढतांना पकडले यावेळी उपस्थित नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, सुनील डोगरा, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, रुपेश टिकले, संजय चन्ने आदी काँग्रेस नेत्याच्या शिष्ट मंडळ त्या ठिकाणी गोडावून वर पाठवून अन्न पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना सूचना दिली त्यानंतर बरडेवार अन्न पुरवठा निरीक्षक गोडाऊन वर आले त्यांना पंचनामा करायला लावले यात उत्तर प्रदेश, पंजाब व हरियाणा येथील बारदानामध्ये दोन ते तीन वर्षापूर्वी चा 45 टक्के खंडा असेला निकृष्ठ तांदूळ भरलेले आढळले होते. याची चौकशी केली असता प्रत्येक बारदाण्यावर निळी पट्टी आवश्यक असतांना पकडलेल्या बारदानावर मिल मालकाचे उल्लेख नसून लाल पट्टी असलेला बारदाना वापरलेला आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित प्रकरणाची माहिती उघडकीस आणून व्यापाऱ्यांशी संघनमत करून आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे तांदूळ सामान्य जनतेला खाऊ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित भ्रष्ट अधिकार्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.

Previous articleजिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..!!
Next articleमहाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संगितराव भोंगळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here