🛑 आजपासून दुकाने, बाजारपेठाही खुल्या रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक कामांसाठी 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 5 जून : ⭕ करोनाच्या संसर्गामुळे गेली दोन महिने बंद असलेली मुंबई शुक्रवारपासून हळुहळु रुळावर येणार आहे. राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत पहिली अनलॉक प्रक्रिया ३ जूनपासून सुरू होणार होती. मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे ती दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. आता ५ जून अर्थात शुक्रवारपासून बाधित क्षेत्र वगळता मुंबईतील दुकाने, बाजारपेठा सुरू होणार आहेत. टॅक्सी आणि रिक्षा सुरू होणार असून त्यांचा वापर अत्यावश्यक कामांसाठी करण्यात येऊ शकतो.
आज पासून
➡️ दुकाने, बाजारपेठाही खुल्या होणार. (मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून)
➡️ सम, विषम तारखेला सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू.
➡️ गॅरेज, वर्कशॉप सुरू. टॅक्सी आणि रिक्षा अत्यावश्यक कामांसाठी.
➡️ उद्याने सुरु. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली करणे शक्य,
व्यायाम करता येणार. मात्र कोणतीही ग्रुप अॅक्टिव्हिटी नाही.
➡️ जवळच्या प्रवासास परवानगी. मात्र, लांब प्रवास करण्यास मनाई.
➡️ प्लंबर, इलेक्ट्रीशन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञांना मास्क बंधनकारक.
➡️ कपड्याची दुकाने सुरू पण दुकानात ट्रायल रूमला परवानगी नाही.
सोमवार पासून
➡️ एमएमआर मधल्या प्रवाशांना पासची आवश्यकता नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण, नवी मुंबईतून कामानिमित्ताने मुंबईकडे येणार्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार.
➡️ सर्व खासगी कंपन्यांना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, तेवढ्या क्षमतेमध्ये काम करता येणार. इतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरून काम करतील.
➡️ ७ जूनपासून वर्तमानपत्रांची छपाई आणि वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. वितरण करणार्या व्यक्तींनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक.
➡️ शिक्षण क्षेत्राशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शाळा-कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कार्यालयीन कामकाजासाठीज काम करता येईल.⭕