Home नांदेड माजी आमदार साबणे, बच्चेवार, केंद्रे, देशमुख, कदम आणि ठाकूर, यांची भाजपाच्या निमंत्रित...

माजी आमदार साबणे, बच्चेवार, केंद्रे, देशमुख, कदम आणि ठाकूर, यांची भाजपाच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

101
0

राजेंद्र पाटील राऊत

माजी आमदार साबणे, बच्चेवार, केंद्रे, देशमुख, कदम आणि ठाकूर, यांची भाजपाच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणी मध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा निमंत्रित सदस्य पदी माजी आमदार सुभाष साबणे, बालाजी बच्चेवार, बाबूराव केंद्रे यांच्यासह सहा जणांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निमंत्रीत सदस्य पदी माजी आमदार सुभाष साबणे , कंधार चे बाबुराव केंद्रे, अर्धापूर चे धर्मराज देशमुख, नायगाव चे बालाजी बच्चेवार, हदगाव चंद्रशेखर कदम, सिडको नांदेड येथील जनार्दन ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या निवडी केल्या आहेत. नवनियुक्त सदस्यांचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनियुक्त निमंत्रित सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या अनुषंगाने नियोजन करून काम करतील अशी अपेक्षा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख,जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

Previous articleमुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करा _सचिन पाटील इंगोले
Next articleनांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवकास शिवीगाळ व धमक्या खपवून घेणार नाही.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here