Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवकास शिवीगाळ व धमक्या खपवून घेणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवकास शिवीगाळ व धमक्या खपवून घेणार नाही.

204

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवकास शिवीगाळ व धमक्या खपवून घेणार नाही.

धनंजय वडजे

नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे युवा मराठा न्यूज

ग्रामीण भागातील विविध ठिकाणी काम करणारे ग्रामसेवक.ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दिवसेंदिवस धमक्या,शिवीगाळ करताना दिसत आहे,ग्रामसेवक हा ही तुमच्यातलाच माणुस आहे यापूढे आसा प्रकार खपवून घेणार नाही आसे मत ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील वडजे यानी एका निवेदनात केले आहे.

देगलूर तालुक्यात शेळगांव ह्या गांवी बांबू लागवड या संदर्भात कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पाशा पटेल हे आले होते.याच गावात कार्यरत आसलेले ग्रामसेवक अमोल जाधव हे या कार्यक्रमाससाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत गांवात उपस्थित राहिले होते पण ग्रामसेवक याची तब्येत बिघडल्याणे ते सायंकाळी 8 वाजता देगलूर येथे निघुण गेले व कार्यक्रमच खुप उशीरा सुरु झाला मग या कार्यक्रमास का आला नाहीत म्हणून पाशा पटेल यानी भर सभेतून मोबाईल वर अंत्यत तिव्र शब्दात शिवीगाळ केले म्हणून ग्रामसेवक संघटनेच्या पदधिकारी यानी एका निवेदनातून यासंदर्भात निषेध व्यक्त केला.

हे निवेदन जिल्हाधिकारी.मुख्य कार्यकारी अधिकारी.उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जि.प.नांदेड.उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जि.प.नांदेड.राज्यध्यक्ष ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र राज्य याना प्रती देण्यात आल्या. तर या निवेदनावर ग्रामसेवक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील वडजे.जिल्हा सचिव हाणामंत वाडेकर.राज्य सघंटक एन,डी,कदम जिल्ह कार्यध्यक्ष श्रीनिवास मुगावे मानद अध्यक्ष गोविद माचनवाड. जिल्हा कोष्ध्यक्ष धमानंद धोत्रे.यांनी सही करुण निवेदन दिले आहे व शिवीगाळ करणार्यास तात्काळ कारवाई करावी अन्यथा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा यात दिला आहे

Previous articleमाजी आमदार साबणे, बच्चेवार, केंद्रे, देशमुख, कदम आणि ठाकूर, यांची भाजपाच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती
Next articleलोककलांचे संगोपन व संवर्धन व्हावे: प्रा. ज्ञानेश्वर भोसले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.