Home नांदेड लोककलांचे संगोपन व संवर्धन व्हावे: प्रा. ज्ञानेश्वर भोसले.

लोककलांचे संगोपन व संवर्धन व्हावे: प्रा. ज्ञानेश्वर भोसले.

56
0

राजेंद्र पाटील राऊत

लोककलांचे संगोपन व संवर्धन व्हावे: प्रा. ज्ञानेश्वर भोसले.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
( शंकरनगर); महाराष्ट्राला लोककलांची व लोकसाहित्याची समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. आज विद्यापीठ पातळीवर लोककलांचा अभ्यास होत असून अनेक उपेक्षित लोककलांना प्रतिष्ठा लाभत आहे. प्रसारमाध्यमांमधून लोककलांचे प्रसारण होत आहे. वासुदेव,भजन,भारुड, गोंधळ, कीर्तन या लोककलांप्रमाणे डोंबारी, बहुरूपी अशा लोककलांचेही संगोपन व संवर्धन झाले पाहिजे, असे विचार प्राध्यापक ज्ञानेश्वर भोसले यांनी मांडले. शंकरनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने, मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 2022 च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ. मीनलताई पाटील खतगावकर या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवर व्याख्यानास उपस्थित होते, प्रमुख वक्ते म्हणून श्री. पी. एल. श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय चिंचणी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथील प्रा. ज्ञानेश्वर भोसले हे बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विश्वनाथ रत्नाळीकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. शरदचंद्र देगलूरकर यांनी केले. यावेळी ऑनलाईन पद्धतीने त्र्यंबक स्वामी, राजू गायकवाड, प्रा.डाॅ.गोविंद पाटील, प्रा.एम.एस.सगरोळे, डॉ. भगवान वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते तसेच डॉ. शंकर लेखने, डॉ. हेमंत बक्षी, डॉ. चेरीकर, डॉ. भुमरे व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Previous articleनांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवकास शिवीगाळ व धमक्या खपवून घेणार नाही.
Next articleलसीकरणामूळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली – राज्यमंत्री, डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here