Home बुलढाणा संग्रामपूर तालुका हद्दीतील बोगस व महाराष्ट्र परवैधिकिय परिषद ची नोदणी न केलेल्या...

संग्रामपूर तालुका हद्दीतील बोगस व महाराष्ट्र परवैधिकिय परिषद ची नोदणी न केलेल्या क्लिनिकल लॅब संचालक विरुद्ध कारवाई करण्याची मागणी

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0057.jpg

संग्रामपूर तालुका हद्दीतील बोगस व महाराष्ट्र परवैधिकिय परिषद ची नोदणी न केलेल्या क्लिनिकल लॅब संचालक विरुद्ध कारवाई करण्याची मागणी
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलढाणा
संग्रामपुर तालुका हद्दीतील अवैध व कुठलेही शासकीय नोंदणी नसलेल्या क्लिनिकल लॅब व आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतांना देखील अवैधरित्या बोगस लॅब धारक रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. 21 ऑगस्ट 2022 रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब यांनी तपासणी केली असता अनेक लॅब रिपोर्ट वर ज्यांचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नाव टाकलेले आहे तरीही अनेक ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हजर नव्हते तिथे बारावी पास खोटे डिप्लोमा घेऊन लॅब चालवत होते.. त्यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबांनी प्रत्येक लॅबचे रिपोर्ट पेज,आधार कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र घेतलेले आहेत. यामधून काही अवैध लॅब आढळून आले आहेत. आणि काही नोंदणीकृत प्रयोगशाळा व्यवस्थित रित्या सुरू आहेत. म्हणून आम्ही नोंदणीकृत प्रयोगशाळा तंत्रज्ञ असून जे काही लॅब अवैध असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अश्या मागणिचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी,रोजतकार साहेब तालुका न्याय दंडाधिकारी मा वरणगावकर साहेब ,तसेच मा ठाणेदार ऊलेमाले साहेब यांना खासगी प्रयोगशाळा संचालकांनी सदर निवेदन सुपुर्त केले यावेळी मा तालुका वैद्यकीय अधिकारी तहसिल दार साहेब यांनी संबधित बोगस लॕब धारकावर योग्य ति कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी विजय रहाटे (रहाटे लॅब) प्रशांत इंगळे (आसरा लॅब) अशोक वानरे(धन्वंतरी लॅब) सैयद वसीम, शेख किस्मत, देवानंद तायडे, निखिल शेळके, राहुल गावंडे इत्यादी उपस्थित होते.

Previous articleमुंबादेवीत बॅनरवरून तीन मनसैनिकांकडून महिलेला मारहाण
Next articleशहाजी मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित अनाथ मुलांना खाऊ वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here