Home मुंबई मुंबादेवीत बॅनरवरून तीन मनसैनिकांकडून महिलेला मारहाण

मुंबादेवीत बॅनरवरून तीन मनसैनिकांकडून महिलेला मारहाण

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0054.jpg

मुंबादेवीत बॅनरवरून तीन मनसैनिकांकडून महिलेला मारहाण                                                            मुंबई ,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

गणेशोत्सवाचे बॅनर उभारताना हटकल्याने महिलेला मारहाण केल्याच्याप्रकरणात नागपाडा पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विनोद अरगिले, राजू अरगिले आणि सतीश लाड अशी या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवापूर्वी ही घटना घडली होती. यातील तक्रारदार ५७ वर्षीय महिलेचे मेडीकल दुकान आहे. या दुकानासमोर मनसेचे पदाधिकारी विनोद अरगिले हे गणेशोत्सवाचे बॅनर लावण्यासाठी आले होते. त्यांनी तक्रारदार यांच्या दुकानासमोर खांब उभा करताच तक्रारदार यांनी त्याला येथे खांब उभा करण्यास विरोध केला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर विनोद अरगिले यांनी या महिलेला मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य आरोपींनीही या महिलेला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आरोपींनी धक्का दिल्याने दोन ते तिन वेळा महिला तेथे पडलीसुद्धा होती. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here