Home रत्नागिरी गडकिल्ले वाचवण्यासाठी सोमेश्वरमधील तरुणाची देखाव्यातून साद

गडकिल्ले वाचवण्यासाठी सोमेश्वरमधील तरुणाची देखाव्यातून साद

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0053.jpg

गडकिल्ले वाचवण्यासाठी सोमेश्वरमधील तरुणाची देखाव्यातून साद                                                 रत्नागिरी,(सुनील धावडे)

गडकिल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला असताना आता सोमेश्वर मधील तरुणाने गणेशोत्सव देखाव्यातून गडकिल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे. पावनखिंड सिनेमा पाहिल्यानंतर प्रेरणा घेत हा देखावा साकारल्याची प्रतिक्रिया सोमेश्वर येथील मयूर भितळे या तरुणाने दिली.

मयूर भीतळे हा रत्नागिरीतील सोमेश्वर येथील रहिवासी आहे. मागील चार वर्षे हा तरुण गणपतीला देखावा साकारत आहे. मात्र, यावर्षी मयूरने साकारलेला देखावा लक्षवेधी ठरत आहे. यावर्षी मयूरने देखाव्यातून गडकिल्ले बचाव करण्याचा संदेश दिला आहे.

यावर्षीच्या देखाव्यात मयूरने पावनखिंड आणि विशाळगडची प्रतिकृती उभारली आहे . ज्या दिवशी पावनखिंड चित्रपट पाहिला त्या दिवशी बाजीप्रभू हृदयामध्ये भरले आणि त्याच दिवशी हा देखावा गणेशोत्सवात साकारण्याचा निश्चय केल्याचे मयूर याने सांगितले. स्वराज्याच्या राजांना सुखरूप विशालगडापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलून घोडखिंडीला पावनखिंड बनवणाऱ्या महायुद्धाला मानाचा मुजरा या देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मयूर याने सांगितले.

महाराजांचे किल्ले ही स्वराज्याची आठवण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावत हे किल्ले स्वराज्यात आणले. या किल्ल्याचे पावित्र्य जपण्याचे काम प्रत्येकाचे आहे असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

स्वराज्याचे किल्ले सुरक्षित रहावे व पुढील अनेक पिढ्यांना महाराजांचे कार्य माहिती व्हावेत यासाठी हे किल्ले सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

मयूर याने पावनखिंडच्या बाजूला किल्ले विशालगड हा किल्ला बनवला आहे. आज विशाल गडावर अनेक ठिकाणी अस्वछता आहे. किल्ल्यावर घाणीचे खूप साम्राज्य आहे. विशालगडावरील कचऱ्याचे साम्राज्य कमी झाले पाहिजे. विशालगडासह महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर स्वच्छता राखली पाहिजे असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. हा देखावा साकारताना मयूरला अभिजीत आलीम याने मदत केली.

Previous articleऐन गणेशोत्सवात राजापूर पाचलमधील ए.टी.एम. सहित इतर मशीनही बंद ग्राहकांमध्ये तीव्र संताप
Next articleमुंबादेवीत बॅनरवरून तीन मनसैनिकांकडून महिलेला मारहाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here