Home नांदेड कोकलगाव पाझर तलावाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

कोकलगाव पाझर तलावाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20221205-WA0007.jpg

कोकलगाव पाझर तलावाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून घेण्यात आलेले कोकलगाव पाझर तलावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबद्दल या कामाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी म्हणून देगलूर उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष महादेव उप्पे यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोकलगाव पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून या कामाची सुरुवात दि.१२ मे २०२२ ते दि.१८ जुलै २०२२ या कालावधीत पुर्ण करण्यात आले आहे. या कामाला लागणारे अंदाजित रक्कम रु.४१,६१,२४७ एवढे असून या कामात खुप मोठा भृष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असून सुद्धा जलसंवर्धन विभाग मात्र या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत.या कामावरील गुत्तेदारांना संपर्क साधला असता त्यांनी ह्या कामाची अवधी संपली असून या कामावरील अभियंत्याला संपर्क करावा,माझा त्या कामात कसलाच संबंध नसल्याचे बोलत आहे.परंतू या कामावरील अभियंत्याला संपर्क साधला असता त्यांचा फोन लागत नाही.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना निवेदन देताच श्रीमती सौम्या शर्मा यांनी योग्य मार्गदशन करीत या कामासाठी लागणारी अंदाजित रक्कम जलसंवर्धन विभागातून वर्ग केल्यामुळे त्यांनासुद्धा निवेदन देण्यात यावे व या निवेदनाची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Previous articleद. ग. तटकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त तळे येथे परिसंवाद संपन्न
Next articleपालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here