Home रत्नागिरी ऐन गणेशोत्सवात राजापूर पाचलमधील ए.टी.एम. सहित इतर मशीनही बंद ग्राहकांमध्ये तीव्र संताप

ऐन गणेशोत्सवात राजापूर पाचलमधील ए.टी.एम. सहित इतर मशीनही बंद ग्राहकांमध्ये तीव्र संताप

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0052.jpg

ऐन गणेशोत्सवात राजापूर पाचलमधील ए.टी.एम. सहित इतर मशीनही बंद ग्राहकांमध्ये तीव्र संताप         रत्नागिरी,(सुनील धावडे)

राजापूर तालुक्यातील पाचल येथे बाजारासाठी व इतर दैनंदिन व्यवहारासाठी लोक ये – जा करतात. सध्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून अनेक चाकरमानी गावी आलेले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

खरेदीसाठी आलेल्या लोकांकडे विशेषतः मुंबईच्या चाकमान्यांकडे खिशात पैसे असतीलच असं नाही, सध्या डिजिटल युगात जो तो पैसे बँक खात्यात ठेऊन ऑनलाईन किंव्हा इतर पद्धतीने खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात, तर काही ए.टी.एम. कार्ड ने पैसे विड्रॉल करून खरेदी करतात. ऑनलाईन खरेदीच्या सुविधा पाचलच्या ठिकाणी अजून हव्या तशा सक्रिय नसल्यामुळे खात्यातील पैसे ए.टी.एम.द्वारे काढून खरेदी करण्याला सर्वांची पसंती आहे.

पाचल मध्ये असंख्य को-ऑपरेटिव्ह बँका आहेत, तसेच बँक ऑफ इंडिया ही नॅशनलाईज बँक देखिल आहे,जी ए. टी.एम. ची सेवा पुरवते.

बँक ऑफ इंडियाचे खातेदार परिसरात असंख्य आहेत. वेळ वाचावा म्हणून बँक ऑफ इंडिया द्वारे पैसे विड्रॉल करण्यासाठी, पैसे डिपॉझिट करण्यासाठी, शाखेच्या बाहेर ए.टी.एम.मशीन, कॅश डिपॉझिट मशीन तसेच पासबुक प्रिंटिंग मशीन, अशा एकूण चार मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळात देखिल या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मशीन पैकी एकही मशीन सध्या कार्यरत नसल्याने पैसे काढणाऱ्या, पैसे भरणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी ए.टी.एम.ची नवीन मशीन आणण्यात आले होते, परंतू ते ऍक्टिव्ह होण्यासाठी जवजवळ 20 दिवस ग्राहकांना वाट पाहावी लागली होती. ते चालू झाल्यानंतर आता पुन्हा कॅश नसल्याने पुन्हा त्या मशीन बरोबर बाकी इतर मशीन देखील बंद पडल्या आहेत.

शाखेच्या व्यवस्थापकांना संपर्क साधला असता, आम्ही सतत वरिष्ठांच्या तसेच संबंधित लोकांच्या संपर्कात असतो, परंतू त्यांच्याकडूनच सुविधा उशिरा पुरवल्या जातात त्यामुळे आमचाही नाईलाज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे राजापूर अर्बन बँक पाचल शाखेच्या एटीएमला मात्र ग्राहकांनी जास्त पसंती दिली आहे. कारण मशीन मधील कॅश संपल्या संपल्या तात्काळ यामध्ये पैसे जमा करून ग्राहकांना सुविधा पुरवत असल्याने सध्या या ए.टी.एम. समोर ग्राहकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळंत आहेत.

Previous articleखेड तालुक्यातील दयाळ येथील तरुणांचा मनसेत प्रवेश
Next articleगडकिल्ले वाचवण्यासाठी सोमेश्वरमधील तरुणाची देखाव्यातून साद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here