• Home
  • 🛑 मुंबईत पुन्हा ‘धो-धो,….! हवामान खात्याने दिला इशारा 🛑

🛑 मुंबईत पुन्हा ‘धो-धो,….! हवामान खात्याने दिला इशारा 🛑

🛑 मुंबईत पुन्हा ‘धो-धो,….! हवामान खात्याने दिला इशारा 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕- मुंबई शहरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी सचलं असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही भागांत लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

त्यातच मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन दिवसापासून पडत असणाऱ्या पावसाने वादळांच रुप धारण केलं आहे. असाच पाऊस मुंबईत पुन्हा 11 ऑगस्टला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत दोन दिवसांपासून सतत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परिसरात पाणी साचलं आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्या खाली गेल्या आहे.

मुंबई पाऊस केंद्रीय हवामान खात्याचे संशोधक डॉ. जेनामनी यांच्या म्हणण्यानुसार 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे परिसरामध्ये आजही पाऊस होण्याची शक्यता असून उत्तर कोकणामध्ये आगामी दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात पाऊस झाला आणि वेगाने वारे वाहले हे 25 वर्षात पहिल्यांदाच झाले. बंगालच्या उपसागराच्या तुलनेमध्ये अरबी समुद्र अधिक सक्रिय असल्यामुळे हा मुसळधार पाऊस झाला आहे.

जर रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला असता तर मुंबईत विदारक परिस्थिती निर्माण झाली असती असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याच अंदाज वर्तवण्यात आला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment