Home नांदेड कु. अस्मिता कांबळे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज!

कु. अस्मिता कांबळे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज!

22
0

आशाताई बच्छाव

1000302552.jpg

कु. अस्मिता कांबळे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज!

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड देगलूर – देगलूर कॉलेज देगलूर येथे उपप्राचार्य पदावर कार्यरत असलेले प्रा. उत्तमकुमार कांबळे यांची कन्या कु. अस्मिता कांबळे ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी (एमबीबीएस) नुकतीच प्राप्त केली आहे. त्याबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
अस्मिता कांबळेचे प्राथमिक , शिक्षण देगलूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात झाले. तर माध्यमिक शिक्षण साधना हायस्कूल, देगलूर येथे झाले. पुढील शिक्षण लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रा .उत्तमकुमार कांबळे यांच्या परिवारातील एकूण सहा व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामध्ये उत्तमकुमार कांबळे यांची लहान बहीण सौ. सुवर्णा बबन सूर्यवंशी यांचे तीनही आपत्य वैद्यकीय शिक्षणात आहेत. त्यातील डॉ. प्रतीक सूर्यवंशी हे उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर प्राची बबन सूर्यवंशी ही जे जे हॉस्पिटल, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच प्रणित सूर्यवंशी इस्लामपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तर मोठी बहीण सौ. विद्या अजय मुळे यांचा मुलगा विक्रांत मुळे रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
प्रा. उत्तमकुमार कांबळे यांची दुसरी कन्या अनुष्का कांबळे ही , हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय जुहू, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सर्वजण वैद्यकीय शिक्षणाकडे वळण्याची मूळ पेरणा ही महामानवांच्या विचारात दडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा चालविणारे, प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी सरपंच स्मृतीशेष रामचंद्र कृष्णाजी कांबळे (शिंगे) यांचे सामाजिक दायित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचे काका स्मृतीशेष प्रा. डी. के. कांबळे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत महामानवांचा विचार अंगीकारल्याने समाजसोबत कुटुंबाची प्रगती होऊ शकली.
कांबळे कुटुंबातील हे सहा डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेतून आपला वेगळा ठसा नक्कीच उमटवतील यात शंका नाही. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रा. उत्तमकुमार कांबळे व डॉ. संजय कांबळे यांचा वारसा ते नक्कीच पुढे नेतील. त्यासाठी या सर्व यशवंतांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Previous articleलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी यात्रा
Next articleकाही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here