Home गडचिरोली यंदाही दमा औषधीचे वाटप नाही।

यंदाही दमा औषधीचे वाटप नाही।

105

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0028.jpg

यंदाही दमा औषधीचे वाटप नाही।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): जिल्हाच्या देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कोकडी या गावी दरवर्षी मृग नक्षञाच्या दिवसी मासोळीतुन दमा औषधचे नि:शुल्क वाटप केले जाते.पंरतु, कोरोणाचे सावट अजूनही पूर्णपणे गेले नसल्याने यंदाही दमा औषध वितरीत न करण्याचा निर्णय वैद्यराज प्रल्हाद सोमा कावळे यांनी घेतला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी औषधी न देण्याचे यंदाचे सलग तिसरे वर्ष आहे.

देशात सुरु असलेल्या कोरोना साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.औषधीचा लाभ घेण्यासाठी राज्यातीलच नव्हे, तर देशातील विविध राज्यातुन दमा रुग्ण कोकडी येथे दाखल होत असतात.त्यामुळे कोकडी येथे हजारोच्या संख्येते रुग्ण जमा होतात.परिणामी कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी समाजहित समोर ठेऊन औषधी वाटप न करण्याचा निर्णय केला.दमा रुग्णांनी कोकडी येथे येऊ नये,अशी माहीती प्रल्हाद कावळे यांनी दिली.

Previous articleभरधाव ट्रकने महिलेला चिरडले।
Next articleचंद्रपूर जिल्ह्यातील चार पीएचसीचे लोकार्पण ! नांदा, भंगाराम-तळोधी, विरुर स्टेशन आणि शेणगाव पीएचसीचा समावेश !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.