Home गडचिरोली भरधाव ट्रकने महिलेला चिरडले।

भरधाव ट्रकने महिलेला चिरडले।

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0029.jpg

भरधाव ट्रकने महिलेला चिरडले।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): भरधाव वेगात असलेल्या ट्रकने बैलगाडिवरील महिला खाली कोसळली असता ट्रकने महिलेले चिरडल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास धानोरा- मुरुमगाव मार्गावरील सालेभट्टि गावाजवळ घडली.मंगला शामराव महुरले (46) प्रभाग क्र.10 रा. धानोरा असे मृतक महिलेचे नाव आहे.यात बैलगाडी चालकासह बैलसुध्दा जखमी झाले असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार मंगला महुरले या बैलगाडिवर बसुन शेताकडे जात होत्या. दरम्यान मुरुमगाव येथुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने सालेभट्टि- वडगाव गावाच्या मधोमध बैलगाडिला जोरदार धडक दिली.या धडकेमुळे मंगला बैलगाडिवरुन खाली कोसळल्या गेल्या.दरम्यान भरधाव वेगात असलेले ट्रक थेट त्यांच्या अंगावरुन गेले.सदर अपघात एवढे भिषण होते कि यात महिलेचा मेंदू रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडून होता.यात बैलगाडी चालक व बैलानां थोळीफार दुखापत आली आहे.घटनास्थळावरुन ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला असुन अधिक तपास धानोरा पोलिस करित आहेत.वृत्त लिहिस्तोवर बैलगाडी मालकाचे नाव कळू शकले नाही.

Previous articleगडचिरोलीतील प्रथम मेडिकल कॉलेज तातडीने मंजूर करा
Next articleयंदाही दमा औषधीचे वाटप नाही।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here