Home गडचिरोली गडचिरोलीतील प्रथम मेडिकल कॉलेज तातडीने मंजूर करा

गडचिरोलीतील प्रथम मेडिकल कॉलेज तातडीने मंजूर करा

102

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0030.jpg

गडचिरोलीतील प्रथम मेडिकल कॉलेज तातडीने मंजूर करा

आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने अखेर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकासजी खारगे यांना दिले पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील अडीच वर्षात एकदाही भेट न झाल्याने व्यक्त केली नाराजी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विषयक समस्यांची प्रथम आवश्यकता लक्षात घेता प्रथमतः शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन केली

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरिता मंत्रालयात गेले असता मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने अखेर त्यांचे निवेदन त्यांच्या प्रधान सचिवांकडे देत सदर बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यावी अशी विनंती त्यांच्याकडे केली. तसेच मागील अडीच वर्षापासून मुख्यमंत्री एकदाही न भेटल्यामुळे नाराजीही व्यक्त केली

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये आदिवासी विकास विभागाकडून निधीची तरतूद होताच जिल्ह्याला लवकरच मेडिकल कॉलेज देण्यात येईल असे आश्वासन या भेटीदरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले. आमदार महोदयांनी यावेळी गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज संदर्भात सुरू असलेल्या चुकीच्या निर्णयांबाबत उपमुख्यमंत्र्यांना अवगत केले. प्रथम आवश्यकता मेडिकल कॉलेजची असल्याने त्यानंतर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चा विचार करण्यात यावा असे अशीही विनंती त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.

मागील अडीच वर्षापासून आपण गडचिरोली जिल्ह्याच्या विविध विकासात्मक कामासंदर्भात किंवा समस्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता ते मंत्रालयात बसत नसल्याने आमदारांनाही त्यांना भेटता येत नाही यबाबत नाराजी व्यक्त करीत ही एक मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले

Previous articleओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्वरत करण्याकरीता ओबीसी नेते प्रमोदजी पिपरे यांनी समर्पित आयोगाच्या अध्यक्षांना दिली भेट
Next articleभरधाव ट्रकने महिलेला चिरडले।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.