Home नांदेड रामदास पाटील सुमठाणकर यांना साम टीव्ही चा ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड जाहीर

रामदास पाटील सुमठाणकर यांना साम टीव्ही चा ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड जाहीर

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0025.jpg

रामदास पाटील सुमठाणकर यांना साम टीव्ही चा ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड जाहीर

▪️दुबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड – यंदाचा साम टीव्ही च्या ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड नांदेडचे निवृत्त प्रशासन अधिकारी तथा राष्ट्रसंत मिशनचे प्रमुख रामदास शिवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.8 जुन रोजी दुबईत होणाऱ्या एका भव्य सोहळ्यात पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुमठाण येथील मात्र, सध्या नांदेड मध्ये स्थायिक झालेले दिव्यांग असलेल्या रामदास शिवराज पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिव्यांग वसतीगृहात राहून,आश्रम शाळेत निवासी अभ्यास करुन प्रशासनात मुख्याधिकारी म्हणून सेवा मिळवली… आणि 12 वर्ष सेवा पुर्ण केली.प्रशासन सेवेत असताना आपल्या धाडसी कामामुळे समाजोपयोगी व नवनवीन प्रयोग करणारे अधिकारी म्हणून शासनस्तरावर दखल घेत अनेक पुरस्कार मिळविणारे माननीय रामदास पाटील यांनी स्वतःची राज्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. दिव्यांग असतानाही महत्वाकांक्षा आणि जिद्दीच्या जोरावर अनेक उपलब्धी मिळवलीय. शासनाकडून महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवेत संस्थेला सत्कार प्राप्त झाले . तसेच चीन आणि अमेरिका राष्ट्रच्या अभ्यास दौरा केला.
सामाजिक कार्याची आवड असल्याने प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेत पाटील यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले… त्याच बरोबर वचन स्थंभ चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड मार्फत राष्ट्र संत मिशनच्या माध्यमातून गोरगरिब विद्यार्थ्यांना साठी युपीएसस्सी, एमपीएससी अभ्यासासाठी नांदेड मध्ये मोफत अभ्यासिका केंद्र सुरू केलीय.तसेच नामांकित तज्ञांचे शिबीर आयोजित केले. त्यांचं नांदेड, हिंगोली जिल्ह्य़ातील कोरोनाच्या काळात हजारो रुग्णांसाठी केलेलं काम स्मरणार्थ राहणारे आहे… एवढचं नाही तर सामान्यच्या अडचणीत पडलेल्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आणि स्वतःला झोकून देणारा माणूस म्हणून पाटलांची मराठवाड्यात ओळख झालीय. दिव्यांग मुलीच पालकत्त्व स्वीकारून मदत केले ती मुलगी टॉकीयो येथे प्यारालंम्पिक खेळली .लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले पाटील हे त्यांच्या ट्रस्ट वर काही काळ गुरु च्या आदेशानुसार अध्यक्ष होते. पाटील यांच्या अशा अनेक कामांची पावती म्हणून साम टीव्ही ने पुरस्काराची निवड केली आहे.
दरम्यान, रामदास पाटील यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here