Home भंडारा विर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय :- वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

विर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय :- वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_185930.jpg

विर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय :- वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )विरशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय होत असून त्याच्या परिणाम लहान शिशु बालकांवर सुद्धा होत आहे याकडे प्रशासनाला लक्ष द्यावे तसेच तेथे अस्वच्छता निदर्शनास येत आहे .त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत ते रुग्णांसोबत चांगल्या प्रकारचे वर्तन नाही अशी तक्रार आहे.
वीरशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपरेशनचे 11 रुग्णांची सोय असून त्या ठिकाणी त्यापेक्षा जास्त लोक दिसतात तेथे अपूरी वेवस्था आहे . जेवण करायला व उभा राहिला जागा राहत नाही .डिलिव्हरी ऑपरेशन रुग्णाला भेटायला येणारे जे नातेवाईक असतात ते पण त्या ठिकाणी थांबतात .त्यामुळे हे सर्व बघता गर्दी खूप असते. लहान शिशु बालकांना या सर्व गोष्टीचा त्रास होतो .11 रुग्ण चांगले सुरळीत राहिले पाहिजे त्यातही मोकळी जागा असायला पाहिजे .बेड अंतर ठेवून असायला पाहिजे जेणेकरून कोणाचा त्रास होता कामा नये अशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे .सर्वांना चांगल्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे .डॉ वेळेवर रुग्णांचे भेटी घेत नाही . प्रशासन बरोबर काम करत नाही .अशा पद्धतीच्या आरोप वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी केला आणि त्यांनी सांगितले की जर रुग्णांची व्यवस्था बरोबर झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला या संबंधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी डॉ रुपेश बडवाईक यांची भेट घेऊन त्यांना तेथील समस्यांची जाणीव करून दिली तालुका आरोग्य अधिकारी डॉ रुपेश बडवाईक यांनी आश्वासन दिले की आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करू रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ त्यांचे आरोग्य चांगले राहील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू अशी आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांना दिले याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव अमित नागदेवे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here