Home नांदेड देळुबच्या घटनेचा लोहयात निषेध ;आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची सकल मराठा समाजाची...

देळुबच्या घटनेचा लोहयात निषेध ;आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी

89
0

आशाताई बच्छाव

IMG-20230626-WA0028.jpg

देळुबच्या घटनेचा लोहयात निषेध ;आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची सकल मराठा समाजाची मागणी
अंबादास पाटिल पवार
लोहा / प्रतिनिधी
देळूब येथील त्या घटनेचा लोहा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने लोहा पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले .
पुढे निवेदनात असे नमूद केले की,
अर्धापूर तालुक्यातील देळुब येथील मतिमंद १३ वर्षीय बालिकेवर अमानुषरित्या लैंगिक अत्याचार झाला असुन आरोपी राहुल चांदोजी वाघमारे वय ३० याला अर्धापूर पोलिसांनी अटक केले आहे .
सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असुन तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना वेळीच कडक शिक्षा झाली नाही तर समाजात अशाच घटना घडत राहतील त्यामुळे या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी लोह्यातील सकल ‌मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक लोहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी माऊली पाटील पवार, विजय पाटील चव्हाण , ,‌ प्रा ‌बाळासाहेब जाधव , नंदाजी पाटील इंगळे , भानुदास पाटील पवार , केशव पाटील पवार , निळकंठ वडजे , बालाजी नळगे , गोपाळ जाधव आदी उपस्थित होते

Previous articleभुदान चळवळीचे नेते मा एकनाथ डगवार यांची गडचिरोली येथील सर्वोदय शाखेला सदिच्छा भेट.
Next articleनांदेड जिल्ह्यात शिवसेना आल्पसंख्याक आघाडी गतीमान करनार,पटेल जैनोदिन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here