Home मुंबई देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

111

आशाताई बच्छाव

IMG_20231210_190254.jpg

देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

आंशुराज राऊत पाटील वृत्तसंपादक युवा मराठा न्युज

मुंबई, :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.

Previous articleविर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय :- वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
Next articleमुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.