Home नांदेड महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बँकेमध्ये झेरॉक्स सेंटर का झेरॉक्स सेंटरमध्ये...

महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बँकेमध्ये झेरॉक्स सेंटर का झेरॉक्स सेंटरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक –

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0020.jpg

महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बँकेमध्ये झेरॉक्स सेंटर का झेरॉक्स सेंटरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक –
भागवत पाटील सोमूरकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर- देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गोरगरीब जनतेला कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी बाजूच्या झेरॉक्स सेंटरचा वापर करावा लागत आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झेरॉक्स सेंटर आहे का झेरॉक्स सेंटर मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे असे निवेदन देगलूर तहसिलदार मा.राजाभाऊ कदम यांना शिवसेनेचे भागवत पाटील सोमुरकर यांनी दिले .
हणेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत किमान पन्नास हजार खातेदार आहेत परंतू या खातेदारांना या ठिकाणी वागणूक व्यवस्थित मिळत नसल्यामुळे काही खातेदार नाराज आहेत. याठिकाणचे रोखपाल प्रत्येक खातेदारांना अरेरावीची भाषा वापरतात.या बँकेत खातेदारांना खाते उघडण्यासाठीचा फॉर्म,कृषी गंगा क्रेडीट कार्ड नुतनीकरण फॉर्म, सहीच्या नमुन्याचा फॉर्म या सर्व कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी बाजूच्या झेरॉक्स सेंटरवर जाऊन स्वताच्या खिशाला झळ पोहोंचवावी लागत आहे.परंतू बॅकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.या बँकेला यांच्या मुख्य ऑफीसवरून कागदपत्राची पुर्तता होत असताना याचा वापर खातेदारासाठी का होत नाही.याची विचारणा खातेदारात होत आहे.
सद्या घडीला खाते नुतनीकरणाची मोहिम चालू असून या बँकेत खातेदारांना फॉर्म मिळत नाही,हे फॉर्म बाजूच्या झॅरॉक्स सेंटरवर घेण्यासाठी सल्ला देत असल्याची माहिती येथील खातेदार सांगत आहेत. हे एक फॉर्म घेण्यासाठी विस ते तिस रुपये मोजावे लागत आहेत तर काहींना फॉर्म भरून घेण्यासाठी याठिकाणी पैसे मोजावे लागत आहे. या बँकेला लागणारी सर्व कागदपत्रे या झेरॉक्स सेंटरवर मिळतील याची माहिती या बँकेतून मिळत आहे.
हणेगाव येथे मुद्रांक शुल्क विक्री करण्यासाठी कुणाकडेही परवाना नसताना याठिकाणी अवैद्यरित्या विक्री केली जाते. हि विक्री बँकेमार्फत केली जाते का स्वतः विक्री केली जाते याचा आणखीसुद्धा माहिती मिळाली नाही. यावेळी संध्याराणी झेरॉक्स सेंटरवर एका मुद्रांक शुल्काची किंमत किमान दोनशे ते अडीचशे रुपये घेतली जाते. याठिकाणी मुद्रांक विक्री करताना नागरिकांची विचारपूस करून मुद्रांक विक्री केली जाते.देगलूर येथे मुद्रांक खरेदी करण्यासाठी गेले असता ज्या माणसाच्या नावाने पाहिजे तो मानूस उपस्थित पाहिजे त्याचा आधार कार्ड पाहिजे मग याठिकाणी विनापरवाना मुद्रांक विक्री कोणत्या पद्धतीने होत आहे,संध्याराणी झेरॉक्स सेंटरला कुणाकडून मुद्रांक मिळत आहेत? हे मुद्रांक कुणालाही विक्री करता येते का ? मुद्रांक विक्री करण्यासाठी कोणत्या दुकानातून खरेदी करावे लागते ? असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत.
यावेळी शिवसेनेचे भागवत पाटील सोमुरकर यांनी देगलूर तहसिल येथील तहसिलदार मा. राजाभाऊ कदम यांना निवेदन देऊन विनापरवाना मुद्रांक विक्री करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाई करण्यात यावे व बँकेतील कागदपत्रे बँकेतच मिळावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे भागवत पाटील यांनी दिले आहे..

Previous articleरामदास पाटील सुमठाणकर यांना साम टीव्ही चा ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड जाहीर
Next articleगोंडवाना विद्यापीठास आदिवासी व वन विद्यापीठाचा दर्जा द्या: आ.सुधीर मुनगंटीवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here