Home बुलढाणा रेती तस्करांनी केलेल्या खड्ड्यात पडून रोहितच्या मृत्यूनंतर रेती माफियांचे धागेदोरे उघडण्यास सुरुवात...

रेती तस्करांनी केलेल्या खड्ड्यात पडून रोहितच्या मृत्यूनंतर रेती माफियांचे धागेदोरे उघडण्यास सुरुवात म्हणे… कारवाई केल्यानंतर वरिष्ठांकडून वाहने सुटतात ?

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0039.jpg

रेती तस्करांनी केलेल्या खड्ड्यात पडून रोहितच्या मृत्यूनंतर रेती माफियांचे धागेदोरे उघडण्यास सुरुवात
म्हणे… कारवाई केल्यानंतर वरिष्ठांकडून वाहने सुटतात ?

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर:- तालुक्यातील ग्राम काथरगाव येथील तेरा वर्षीय विद्यार्थ्यांचा रेती तस्करांनी केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याने प्रशासकीय स्तरावरील रेती तस्करींचे अंडे पिल्ले बाहेर येण्यास आता सुरुवात झाली आहे. दंडाची कारवाई झालेल्या वाहनांचे अनेक मालकांनी वरिष्ठांकडे अपील केल्यावर ती तशीच सोडून दिल्या गेली त्यामुळे रेती तस्करांचा रोश खालच्याच कर्मचाऱ्यांवर येतो म्हणूनच खालचे कर्मचारी कारवाई करत नसल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. परिणामी तालुकाभर रेती तस्करी ला उधाण आले आहे गेल्या दोन वर्षात दंड सुनावलेली अशी किती वाहने अपिलातुन सोडून देण्यात आली हेच तपासण्याची वेळ आता जिल्हा प्रशासनावर आली आहे 17 ऑगस्ट रोजी काथरगाव येथील रोहित नागेश खंडारे या सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा पांडव नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली कुटुंबात एकुलता एक असलेल्या रोहितच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. अशाच खड्ड्यामुळे वाणनदी, पांडवनदी, पूर्णा इतर नदी पात्रात महसूल विभाग, पोलीस विभाग व संबंधित ग्राम दक्षता समिती यांच्या आशीर्वादाने रीती तस्करांनी जेसीबी द्वारे व काही मजुरांच्या सहाय्याने नदीपात्रात मोठे खड्डे केलेले असल्या मुळे आणि करित असल्यामुळे त्या खड्ड्यात पडूनअशाच लहान मोठ्या घटना घडत असतात. त्यामुळे रेतीसाठी जेसीबी लावून खोदलेले खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. सद्यस्थिती तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव झालेला नसतांना मोठ्या प्रमाणात नाजूक ठिकाणी अगदी पुलाच्या जवळ सुद्धा खोदकामे झाल्याने त्या फुलाला आणि काही गावांना तर पुराचे पाणी गावात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या एक वर्षापासून येथील रेती वाहतूकदारांवर तहसील कार्यालयाचा काहीच अंकुश नाही अर्थात हे सर्व जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही रोहितच्या मृत्यूची बातमी विविध वृत्तपत्रात ठळकपणे उमरटताच या रेती तस्करी मधील अनेक किस्से बाहेर यायला लागली आहेत. एखाद्या वाहनावर कारवाई करून तलाठी मंडळ अधिकारी यांच्या पंचनाम्यानंतर तहसीलदार यावर शासन निर्देशानुसार एक लाख 16 हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाहन मालकास दंडाची नोटीस बजावली जाते त्यावर वाहन मालकास मान्य नसल्यास तो तात्काळ दंड न भरता सदर वाहन मालकाला उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करण्याची मुभा आहे. परंतु वाहनावर कार्यवाही करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तहसीलदार दाखल केल्यानंतर त्या तस्कराकडून स्वार्थापोटी किंवा राजकीय, लोकप्रतिनिधींच्या किंवा वरिष्ठांच्या दबावापोटी सदर वाहन मालकाविरुद्ध कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात येते.बरेच प्रकरणात असे सुद्धा पहावयास मिळते आणि पंचनामा करून कारवाई केलेल्या वाहनांपैकी या दोन वर्षात अशी अपिलातून किती वाहनांना तसेच सोडून दिल्या गेले मग अशी सोडून दिलेल्या वाहन मालकाचा रोश येतो तो खालच्या कर्मचाऱ्यांवर म्हणूनच हे खालचे कर्मचारी कारवाईच्या लफड्यात पडत नाहीत असाच याचा अर्थ निघतो अखेर ते या अवैद्य रेती तस्करांकडे दुर्लक्ष करीत चालू द्या अशी भूमिका घेतात अपिलात गेल्यावर किंवा पंचनामा झाल्यानंतर तहसीलला दाखल केल्यावर त्या दंडाच्या फाईल मध्ये रॉयल्टी चा कागद कसा येतो किंवा सदर वाहनात रेती नव्हती तर खाली होते असा शोध लागते वाहतूक करताना रॉयल्टी असली तर ती वाहतूक करताना सोबत असणे बंधनकारक आहे पण ती नसतांना ती रॉयल्टी नंतर जमा केल्या जाते अशी चर्चा होत आहे. काल सोन्या चांदीचा धंदा करणारे अनेक जण रेतीच्या धंद्यात उतरले यावरून रेतीचे मूल्य समजते. रोहितच्या मृत्यूमुळे रेती तस्करीचे अनेक पैलूआता समोर यायला लागली आहेत तर गेल्या काही वर्षात किती वाहनांचे पंचनामे केल्यानंतर वाहन पळून गेल्या बाबतचे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे दाखल केल्यानंतर वाहन ताब्यात न घेता आज पर्यंत प्रकरण थंड बस्त्यात का आहे आणि अपिलात गेलेल्या किती मालकांची वाहने सोडल्या गेली याची कार्यालयीन चौकशी करा अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

Previous articleमुंबईत यंदा दसरा मेळावा कुणाचा?
Next articleव्याहाड बुज.येथील रानटी डुकराने गुराखीस केले जखमी….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here