Home गडचिरोली व्याहाड बुज.येथील रानटी डुकराने गुराखीस केले जखमी….

व्याहाड बुज.येथील रानटी डुकराने गुराखीस केले जखमी….

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0037.jpg

व्याहाड बुज.येथील रानटी डुकराने गुराखीस केले जखमी….

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :– व्याहाड बुज येथील गुराखी सकाळी १०.०० वा.च्या सुमारास श्री.पुरुषोत्तम सखारामजी जेंगठे हे व्यक्ती रोजच्या दैनंदिन वेळेनुसार
शेळी राखण्यासाठी जात असतांना असोलामेंढा प्रकल्पाच्या नहारात रानटी डुक्कर पडला होता.नहराच्या (पाटाच्या) बाहेर तो डुक्कर निघतात व शेळीपालन गुराखी वाटेने जाताच अशातच वाटेत जात असणाऱ्या गुराख्याला रानटी डुक्कराने गंभीररित्या जखमी करून पळून गेला.गुराखीने आरडाओरड केली असता लगेच त्या गुराखीच्या आजूबाजूचे लोक धावून आले.व प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड बुज येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु गंभीररित्या जखमी असल्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
त्यावेळी ज्ञानेश्वर निकोडे,कवडूजी ठाकूर,व इतर युवावर्ग धावून आले.गडचिरोली येथील दवाखान्यात पेशंट पोहचतात हिंमत मोटघरे ग्राम. पंचायत सदस्य, व सुधाकर म्याकलवार सामाजिक कार्यकर्ते या दोघांनी दूरध्वनीवरून दिवाकर गेडाम यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली.माहिती मिळाल्यावर लगेच घडलेल्या घटनेची माहिती खासदार अशोकजी नेते यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर.त्यावेळी तात्काळ घटनेचे गांभीर्याने दखल घेता खा.अशोकजी नेते यांनी रुग्णाच्या उपचारासाठी सीएस साहेब डॉ.अनिलजी रूडे यांना माहिती देऊन ताबडतोब उपचारासाठी सांगण्यात आले.आणि रुग्णांची फोन वरती विचारपूस केली.
तसेच त्यावेळी साप चावलेले पेशंट शामरावजी गेडाम यांची सुद्धा विचारपूस करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here