Home अकोला जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’चा प्रादुर्भाव पशुपालकांना सजगतेचे आवाहन; प्रशासनाची सज्जता, १९६२...

जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’चा प्रादुर्भाव पशुपालकांना सजगतेचे आवाहन; प्रशासनाची सज्जता, १९६२ टोल फ्री क्रमांक जारी

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0043.jpg

जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’चा प्रादुर्भाव

पशुपालकांना सजगतेचे आवाहन; प्रशासनाची सज्जता, १९६२ टोल फ्री क्रमांक जारी

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : जिल्ह्यात १०९ जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला असून पशुपालकांनी त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात मौजे निपाना ता. अकोला, तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यांचे त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दरम्यान निपाणा ता. अकोला येथील एका जनावरामध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणी नंतर (दि.२४ रोजी) स्पष्ट झाले आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेवून संक्रमण व सांसंर्गिक रोप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकारानुसार मौजे निपाना या संसर्गकेंद्रापासून १० किलोमिटर बाधित क्षेत्र घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी (दि.२५ रोजी) निर्गमित केले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करणास प्रतिबंध लावण्यात आला. तसेच जिल्हा पशुसवंर्धन विभागाने प्रादुर्भाव भागातील पाच किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या क्षेत्र भेटी

दरम्यान जिल्ह्यातील पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी तपासणी करुन पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. आज जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बुकतरे यांनी शिवापुर ता. अकोट येथे भेट देऊन जनावरांची पाहणी व तपासणी केली. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधीत जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिघाच्या क्षेत्रात गोट पॉक्स लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

लम्पि स्किन डिसीज लक्षणेः-

लम्पि स्किन डिसीज हा आजार बाह्य किटकाद्वारे पसरतो. संसर्ग झाल्यास जनावरांना मध्यम स्वरुपाचा ताप २ ते ३ दिवस असतो. काही वेळा १०५ ते १०६ फॅ. इतकाही ताप असू शकतो. ताप येऊन गेल्यानंतर शरीरावर २ ते ५ से.मी. आकाराच्या गाठी येतात. तोंडात, घशात व श्वसन नलिकेत पुरळ येतात. तोंडातील पुरळामुळे जनावराची लाळ गळत राहते. जनावरात अशक्तपणा, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा व तात्काळ जनावरास उपचार द्यावे.

पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये

या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे १ ते ५ टक्के इतके आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. हा आजार बाह्य किटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधीत जनावरावर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी. बाधीत जनावरांला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. बाधीत जनावरांच्या गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड २ टक्के या औषधाची फवारणी करावी. पशुपालकांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

Previous articleव्याहाड बुज.येथील रानटी डुकराने गुराखीस केले जखमी….
Next articleजिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here