• Home
  • 🛑 गुगल सांगणार कोण कॉल करतेय; ‘हे’ फीचर TrueCallerला देणार टक्कर 🛑

🛑 गुगल सांगणार कोण कॉल करतेय; ‘हे’ फीचर TrueCallerला देणार टक्कर 🛑

🛑 गुगल सांगणार कोण कॉल करतेय; ‘हे’ फीचर TrueCallerला देणार टक्कर 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 10 सप्टेंबर : ⭕ सर्च इंजिन कंपनी गुगलकडून नुकतीच Verifired Call या फीचरची घोषणा करण्यात आली आहे. याला फीचरद्वारे आता तुम्हाला कोण कॉल करत आहे ते कळणार आहे. मात्र, हे नवीन फीचर आणण्यामागे कॉल फ्रॉड्स हे कारण सुद्धा असू शकते. परंतु, हे फीचर TrueCallerला टक्कर देणार आहे.

भारतासह जगभरात सध्या फ्रॉड कॉल्स ही मोठी समस्या आहे. तसेच Verified Calls फीचर रोलआउट करण्यासोबतच युजर्संना यापासून वाचवता येवू शकते. त्याचप्रमाणे बिजनेस कॉलच्या स्थितीत युजर्सला दिसेल की, कोण कॉल करतो, आणि का कॉल करतोय. तसेच हे फीचर भारत, स्पेन, ब्राझील मेक्सिको आणि युएससह जगभरात रोलाऊट केले जात आहे.

सध्या अनेक युजर्स TrueCaller Appचा वापर करत आहेत. मात्र, Google Phone Appमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा भाग बनेल. म्हणजेच कोणतेही App डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. तसेच गुगलने लिहिले एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले आले आहेत. त्यामुळे युजर्संना याचा फायदा नक्की होईल’.

गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप android फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone App हेच डायलरचे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone App इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इन्स्टॉल करु शकता. ⭕

anews Banner

Leave A Comment