Home बुलढाणा देवेंद्रप्रताप सोमवंशी व दीपक म्हसाळ यांची नियुक्ती

देवेंद्रप्रताप सोमवंशी व दीपक म्हसाळ यांची नियुक्ती

162

देवेंद्रप्रताप सोमवंशी व दीपक म्हसाळ यांची नियुक्ती

जळगाव (जा), सतिश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क : देशातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारी संघटना किसान एकता संघाच्या राष्ट्रीय सचिवपदी तालुक्यातील आसलगाव येथील देवेंद्र प्रताप सोमवंशी यांची तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी स्थानिक दीपक म्हसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोरेन प्रधान यांनी एका नियुक्तीपत्रद्वारे केली आहे. किसान एकता संघाचे कार्य व संघटन अधिक प्रभावशाली होण्याच्या दृष्टीने देवेंद्र प्रताप सोमवंशी व दीपक म्हसाळ यांची नियुक्ती झाली आहे. मागील दोन वर्षाच्या काळात दीपक म्हसाळ यांनी 13800 हून जास्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि पीक विमा मिळवून देण्यासाठी सरकारकडे तक्रारी दाखल करून कर्जमुक्ती आणि पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे

Previous articleसावंगी भांबळे येथील ग्रामस्थांनी पकडून दिली अवैध देशी दारू
Next articleमुंबईत यंदा दसरा मेळावा कुणाचा?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.