Home परभणी सावंगी भांबळे येथील ग्रामस्थांनी पकडून दिली अवैध देशी दारू

सावंगी भांबळे येथील ग्रामस्थांनी पकडून दिली अवैध देशी दारू

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0029.jpg

सावंगी भांबळे येथील ग्रामस्थांनी पकडून दिली अवैध देशी दारू

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
(परभणी)जिंतूर:- तालुक्यातील सावंगी भांबळे येथील दोन ते तीन महिन्यापासून अवैध दारू मुळे वातावरण तापलेले असताना 26औगस्ट रोजी सकाळी नऊ च्या सुमारास सावंगी येथील ग्रामस्थाना दोन आद्यन्यात युवक सुमेध जाधव आणि जयेश आंधळे रा .अंभुर शेळके ता .मंठा जी .जालना हे दोघे जण एका मोटार सायकल वर तीन अवैध देशी दारूच्या पेट्या घेऊन असल्याची माहिती मिळाली त्यामुळे गावातील वित्ठल पाराजी भांबळे,गणेश भांबळे,अनिल भांबळे,सुनील भांबळे,हनुमान भांबळे,वाघ भांबळे ,अशोक भांबळे यानी तात्काळ सावंगी गावापासून 3किलोमीटर असलेल्या असोला पाटीवर जाऊन अवैध दारू घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या दोन अद्ण्यात व्यक्तींना पकडून त्यांच्या कडील तीन बॉक्स देशी दारू पकडली पण त्यामधील एक व्यक्ती गावकऱ्यांना झटका देऊन मोटरसायकल घेऊन फरार झाला .
त्यानंतर तात्काळ गावकऱ्यांनी बामनी पोलिस स्टेशन चे स .पो .नी . पुंड यांना फोन करून बोलावून आरोपींना आणि सदर मुद्दे माल पोलिसांच्या स्वाधीन केला …
अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा दारू विक्री सुरूच:- गावातीलगावांमधील अनेक तरुण आणि ग्रामपंचायत ने आणि महिला बचत गटाने चार महिन्या आधी मा .पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन सुद्धा गावातील अवैध दारू विक्री बंद का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे गावामध्ये 1ली ते 12 पर्यंत शाळा आहे गावातील बाहेर गावातील मुले-मुली शाळेत येत असतात आणि हे दारू विक्रेते शाळेच्या गेट समोरच दारू विक्री करत आहेत आणि दारू पिऊन लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहेत आणि काहीही बोलत आहेत त्यामुळे याचा परिणाम शाळकरी विध्यार्थी आणि मुलीवर होत आहे

दारुड्यांनी गावातील जी. प .शाळा आणि बस स्टँड ला केला दारूचा अड्डा :-गावातील दारू विक्रेते हे लपून छपून खिशात चार ,पाच दारूच्या बाटल्या विक्री करत आहेत आणि हे दारुडे दारू पिण्यासाठी बसस्टँड आणि जी .प शाळेमध्ये बसून दारू पीत आहेत याचा परिणाम विध्यार्थ्यावर होत आहे

नवीन रुजू झालेले स .पो .नी .पुंड यांच्या कडून अपेक्षा:-बामनी पोलिस स्टेशन ला नवीन रुजू झालेले स .पो .नी . पुंड हे या अवैध देशी दारू विक्रेते आणि त्याना पुरवठा करणारे डिलर्स यांच्या वर कारवाई करून सावंगी गावातील अवैध दारू विक्री पूर्ण पने बंद करतील अशी गाव्कर्याकडुन मागणी होत आहे … बातमी लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती …

Previous articleगावकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत मिरवणुकीत आणि कृतज्ञतापूर्वक केला पोळा सण साजरा..
Next articleदेवेंद्रप्रताप सोमवंशी व दीपक म्हसाळ यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here