Home विदर्भ अख्खे गाव तापाने फणफणतेय! मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू; रविवारी लागणार शिबीर

अख्खे गाव तापाने फणफणतेय! मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू; रविवारी लागणार शिबीर

165
0

राजेंद्र पाटील राऊत

अख्खे गाव तापाने फणफणतेय!

मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू; रविवारी लागणार शिबीर

 

सावली/ गोपाल तिवारी ब्युरो चीफ वाशिम युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ 
तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत आहे. कोरोनाच्या भितीपोटी अनेकजण दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. गावातील ७० टक्के लोक आजारी आहेत. दरम्यान आज शनिवारी शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. आता आठवडाभरात मृतांची संख्या ३ झाली आहे.

तालुक्यातील मेहा बु. हे गाव गत २ आठवड्यापासून तापाच्या साथीने हैराण झाले आहे. तापाच्या साथीने गावातील एकाचा पहिला बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले. दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याची व्यवस्था नाही. कोरोनाची दहशत असताना गावात तापाची प्रचंड साथ आली असून, सर्व घरांमध्ये तापाचे रुग्ण आहेत. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने भीतीपोटी अनेकजण कोरोना चाचणी करण्यास पुढे आलेले नाही. काही तरुणांनी स्वतःहुन चाचणी करून घेतली. पॉझिटिव्ह रुग्णांवर सावली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. गावात चाचणी शिबीर लावण्याची गरज आहे. ताप असल्याने अनेकांनी कोरोनाची लसदेखील घेतलेली नाही. हीच परिस्थिती शेजारच्या गावात आहे. या आठवड्यात आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. गावातील ३ जण दगावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विशेष शिबिर लाऊन आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी दिली आहे.

Previous articleपदोन्नतीतील 33% आरक्षण रद्द           
Next articleआई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here