Home बुलढाणा उत्कृष्ट कामगिरी बद्दल‎ उपविभागातून एकमेव संग्रामपूर तहसीलच्या तलाठी कांबळे सन्मानित‎

उत्कृष्ट कामगिरी बद्दल‎ उपविभागातून एकमेव संग्रामपूर तहसीलच्या तलाठी कांबळे सन्मानित‎

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0088.jpg

उत्कृष्ट कामगिरी बद्दल‎ उपविभागातून एकमेव संग्रामपूर तहसीलच्या तलाठी कांबळे सन्मानित‎

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मागील वर्षात केलेल्या उत्कृष्ट‎ कार्याची दखल घेऊन संग्रामपूर तहसील येथील‎ कार्यरत तलाठी सुषमा कांबळे मॕडम यांना‎ महसूल विभागाने प्रशस्तीपत्रक व‎ पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‎ महसुल दिनी १ ऑगस्ट रोजी जाहीर‎ झालेला हा पुरस्कार त्यांना नुकताच बुलडाणा येथे पार‎ पडलेल्या कार्यक्रमात‎ बुलढाणा जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्या‎ हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात‎ आला. ‎
जळगाव उपविभागातून पुरस्कार‎ मिळवलेल्या कांबळे मॕडम एकमेव‎ तलाठी आहेत. यांनी‎ कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, ‎ आदी नैसर्गिक आपत्ती येणाऱ्या‎ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्व्हे‎ केला. त्यामुळे त्यांची कर्तव्यदक्ष‎ तलाठी म्हणून तालुक्यात ओळख‎ आहे. महाराजस्व अभियान, सात‎ बारा संगणकीकरण, नैसर्गिक‎ आपत्ती, अतिक्रमण निष्कासन, ई‎ फेरफार, पीक कापणी प्रयोग, ‎ आणेवारी आदी दैनंदिन कामे त्यांनी‎ उत्कृष्ठ केली आहेत. या कामगिरी‎ बदद्ल तसेच जनतेला तत्पर सेवा‎ देऊन महसूल ची जनतेमध्ये प्रतिमा‎ उंचावल्यामुळे जिल्हाधिकारी‎ यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. ‎ जिल्हाधिकारी कार्यालयात पार‎ पडलेल्या या कार्यक्रमाला महसुल‎ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ‎संग्रामपूर येथील तहसील कार्यालयात सेवेत‎ असलेल्या पुरस्कार प्राप्त तलाठी‎ कांबळे मॕडम सध्या खळद बु, ‎ काकनवाडा खु, येथे कार्यरत‎ आहेत. जळगाव उपविभागातून‎ सन्मानित झालेल्या त्या एकमेव‎ ठरल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here