Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादच्या वान नदी पुलावरून पाणी असल्यामुळे रस्ता बंद गावकऱ्यांचे आरोग्य...

संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादच्या वान नदी पुलावरून पाणी असल्यामुळे रस्ता बंद गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात ! प्रशासन मात्र झोपेत..?

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0079.jpg

संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादच्या वान नदी पुलावरून पाणी असल्यामुळे रस्ता बंद गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात ! प्रशासन मात्र झोपेत..?

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर :- तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत मधील ग्राम मोमीनाबाद या गावाला जाण्या-येण्या करिता रिंगणवाडी व मोमीनाबाद दोन्ही गावाच्या मध्ये वान नदीवर असलेल्या फुलाची उंची मुळात कमी आणि त्यापुढे हाकेच्या अंतरावर झालेला वान नदीपात्रातील नवीन “बंधारा” हा शाप की वरदान? कारण बंधाऱ्यामुळे गावच्या पाणी पातळीत वाढ तर झाली, पण मागच्या जवळपास आठ ते दहा दिवसापासून वान नदीवरील पुलावरून पाणी असल्याने मोमिनाबाद ते वरवट हा मुख्य संपर्क तुटला त्यामुळे गावात आजारी असलेल्या पेशंटची खूप हेळसंद होत असून आजारी असलेल्या पेशंटला वरवट बकाल येथे उपचारासाठी नेण्याकरिता खांद्यावर घेऊन पुलावरून असलेल्या पाण्यातून जीव मोठीत धरून पार करावे लागते.
आणि गावची मुख्य ओळख असलेल्या केळी पिकाचेही खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून शेतात एक वर्ष राबवून आता काढणीला आलेली केळी शेतात सडते की काय.?
असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. तरी लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे असून संबंधित ग्रामपंचायतने सुद्धा मोमिनाबाद येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नवीन उंच पुलाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करणे गरजेचे असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Previous articleपालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे
Next articleउत्कृष्ट कामगिरी बद्दल‎ उपविभागातून एकमेव संग्रामपूर तहसीलच्या तलाठी कांबळे सन्मानित‎
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here