• Home
  • दहिदी गावाचा सर्वागींण विकास घडवून दाखवणार

दहिदी गावाचा सर्वागींण विकास घडवून दाखवणार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210221-WA0032.jpg

दहिदी गावाचा सर्वागींण
विकास घडवून दाखवणार
असल्याचा नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रा.प.सदस्य यांनी ना.दादासाहेब भुसे यांचे केला वचनबद्ध संकल्प

सिनियर रिपोर्टर सुभाष कचवे युवा मराठा न्युज नेटवर्क(चँनल)
मालेगांव तालुक्यातील दहिदी या गावी अत्यंत अटीतटीने पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडनुकी मध्ये शिवसेना प्रणीत बारा बलुतेदार पँनलचे प्रमुख श्री सोपान बाजीराव वाघ यांचे सह त्यांच्या पत्नी सरपंच सौ.निर्जलाबाई सोपान वाघ उपसरपंच श्री गुलाब शांताराम बिचकुले ग्रा.प.सदस्य सौ.भुराबाई संजय माळी सौ.दिपाली हिम्मत सोनवणे व भुषण सुभाष माळी असे सर्व नवनिर्वाचित पंचकमेटीने मालेगांव येथे येऊन माननीय क्रुषी मंत्री ना.दादासाहेब भुसे यांची भेट घेतली असता नामदार दादासाहेब भुसे यांनी देखील सर्वप्रथम नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.प.सदस्य यांचे अगदी मनापासून अभिनंदन करत असतांना सांगितले की यापुढे सुध्दा तुमच्या दहिदी गावाचा सर्वागींण विकास करुन देण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहणार असल्याचा शब्द दिल्यामुळे पँनल प्रमुख सोपान वाघ यांनी देखील ना.मंत्री महोदय साहेब यांना वचन देतांना सांगितले की साहेब तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या म्हणजे आम्ही सुध्दा तुमच्या सहकार्यानेच आमच्या दहिदी गावाचा चौफेर असा सर्वागींण विकास करुन दाखवल्या शिवाय कदापिही स्वस्त बसणार नाहीत म्हणून पँनल प्रमुख सोपान वाघ व नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व पंचकमेटीने असे अभिवचनच देऊन टाकल्यामुळे क्रुषी मंत्री ना.दादासाहेब भुसे यांनी देखील त्यांचे अगदी मनापासून कौतुक करुन समाधान व्यक्त केल्यामुळे आज संपूर्ण दहिदी ग्रामस्थांमध्ये खरोखरच एक प्रकारे हर्ष आनंदाचे वातावरण तयार होत असल्याचं दिसुन येत आहे.

anews Banner

Leave A Comment