Home रत्नागिरी केकेव्हीयन्स वसुंधरा फाऊंडेशनतर्फे काळबादेवीत ३०० बेल झाडांचे वाटप

केकेव्हीयन्स वसुंधरा फाऊंडेशनतर्फे काळबादेवीत ३०० बेल झाडांचे वाटप

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0083.jpg

केकेव्हीयन्स वसुंधरा फाऊंडेशनतर्फे काळबादेवीत ३०० बेल झाडांचे वाटप

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : तालुक्यातील काळबादेवी येथे श्री देव रामेश्वर नाम सप्ताहाचे औचित्य साधून केकेव्हियन्स वसुंधरा फाऊंडेशनतर्फे भाविकांना बेल झाडांचे वाटप करण्यात आले. बेलझाडांना धार्मिक तसेच आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक घरी एक बेलाचे झाड अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री रामेश्वर कालिका देवस्थानाचे अध्यक्ष प्रकाश शेटये, सभासद रोहिदास मयेकर, सुनील मयेकर, दिवाकर बिर्जे यांचे हा कार्यक्रम राबविण्यासाठी अमूल्य सहकार्य लाभले. झाडांच्या वाटपाचे आयोजन केकेव्हियन्स संस्थेचे सभासद उदय मयेकर यांनी केले. त्यांना जालिंदर मयेकर, ओंकार मयेकर, शरद मयेकर, निखिल मयेकर, संदेश मयेकर, ऋषिकेश नागवेकर, परमानंद नागवेकर, सुरेखा सुर्वे, प्रज्ञेश मयेकर यांचे सहकार्य लाभले. सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री. कुंभार यांनी बेलाची झाडे उपलब्ध करण्यासाठी मदत केली.

केकेव्हियन्सचे अध्यक्ष प्रकाश राऊत यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा संस्थेने संकल्प केला आहे, असे सांगितले. या उपक्रमासाठी काळबादेवीतील ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे. केकेव्हियन्स सोबत काळबादेवी ग्रामपंचायतीचा महत्वाचा सहभाग असून सरपंच सौ. तृप्ती पाटील आणि सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक भाविक बेलाचे झाड घेताना आपल्या परसदारी शुद्ध आणि सात्विक जागा उपलब्ध असल्याचे पाहून बेल झाड घेऊन जात होते. या भावना निश्चितच प्रेरणादायी आणि मंगलमय होत्या. एकूण ३०० बेलाच्या रोपांचे वाटप शिवभक्ताना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here