Home मराठवाडा महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे.सय्यद मिनहाजोद्दिन

महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे.सय्यद मिनहाजोद्दिन

228

राजेंद्र पाटील राऊत

महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे.सय्यद मिनहाजोद्दिन
बीड,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात घरकामगार महिला असून ते लोकांचे घरामध्ये भांडे व धूने करून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवितात.काही महिला या विधवा आहेत, काही महिलांचे पती व्यसनाधीन असल्याने सदर महिलांना स्वतःचे घर चालविणे अवघड झाले आहे.
मार्च २०२० मध्ये संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन लागले होते.सदर कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सदर महिलांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत, उपाशीपोटी दिवस काढण्यास भाग पडले आहे. जर वरील स्वरूपाचे कल्याणकारी महामंडळ अस्तित्वात असते तर, घर कामगार महिला व त्यांच्या कुटुंबियावर लॉकडाऊन च्या काळात उपासमारीची वेळ आली नसती, म्हणून मा. कामगार मंत्री व महिला व बाल विकास मंत्री यांनी स्वतः जातीने व सामाजिक जाणिवेतून लक्ष देऊन सदर गरीब महिला घर कामगार यांच्या कल्याणासाठी महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे तसेच महिला घरकामगार यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी विशेष अनुदान, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या विलाजासाठी विशेष तरतूद तसेच सदर घरकामगार महिलांना वृद्धपकाळासाठी पेन्शन योजना, घर कामगार महिलांना हक्काचा निवारा योजना अश्या विविध नवीन योजना अंमलात आणाव्यात जेणेकरून सदर महिलांना आयुष्य जगण्यास सोपे जाईल अशी मागणी मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दिन यांनी निवेदनाद्वारे मा.कामगार मंत्री व महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे केली आहे

Previous articleदेगलूर तालुक्यातील मौजे तडखेल येथे गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल येथे राजमाता आई जिजाऊ जयंती सोहळा संपन्न .
Next articleराज्यात कोविड १९ च्या लसीकरणाची तयारी पूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.