Home Breaking News उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी...

उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती उत्साहात साजरी..

117
0

उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती उत्साहात साजरी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी उंद्री प.दे. ता. मुखेड येथे
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वजारोहन सरपंच श्रीमती वनिता रमेश गनलेवार यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी दयानंद सोनकांबळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रा वर मनोगत व्यक्त करून अण्णाभाऊ साठे यांचे सयूंक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान ,व त्यांची साहित्यसंपदा यावर मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळाच्या नामफलकाचे आकाश पाटील उंद्रिकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच श्रीमती वनिता रमेश गनलेवार,उपसरपंच सौ. रमाबाई संदीप सोनकांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री डूमने सर , सुधाकर गुरुजी गनलेवार,राजू पाटील सूर्यवंशी, रमेश अण्णा अडबलवार, माधव पाटील पसारे, श्रीराम वडजे, शिवाजी पंदनवाड, पत्रकार बांधव, सैनिक हनमंत वाघमारे ,व्यंकट वादे, उमेश उन्द्रीकर, दयानंद सोनकांबळे, मारोती वाघमारे, हिरामण सोनकांबळे, माधव वाघमारे, वामन सोनकांबळे, बचत गटाचे अध्यक्ष रमाबाई वाघमारे, हनिफाबी शेख आदी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपालघर रिपाई च्यावतीने कोकण पूरग्रस्त भागात मदतीचा हात.
Next articleनायगाव तालुक्यात पूरग्रस्तांना राष्ट्रवादीकडून आर्थिक मदतीचा हात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here