Home Breaking News नायगाव तालुक्यात पूरग्रस्तांना राष्ट्रवादीकडून आर्थिक मदतीचा हात.

नायगाव तालुक्यात पूरग्रस्तांना राष्ट्रवादीकडून आर्थिक मदतीचा हात.

99
0

नायगाव तालुक्यात पूरग्रस्तांना राष्ट्रवादीकडून आर्थिक मदतीचा हात.

पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नरसी : वृत्तसंकलन
महाराष्ट्रातील सहा ते सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पोलादपूर येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली. मुसळधार पावसामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होवून राज्यात विविध घटनेत मोठी मनुष्यहानी होऊन मृत्यूच्या थैमानात 129 जणांचा बळी गेल्याने या आपत्तीच्या काळात पुरबाधितांच्या मदतीसाठी तातडीने उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने घेतला असून त्या अनुषंगाने पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा याहेतूने नायगाव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांच्या पुढाकारातून नरसीच्या राष्ट्रवादी भवन पासून शुभारंभ करीत थेट नायगाव बाजारपेठत आर्थिक मदत जमा केली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या माध्यमातून नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात येणार आहे.

कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकर माजवल्यानंतर अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होवून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याने पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून बैठक घेत राज्यातील संबंध जिल्ह्यात आणि तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मदत फेरी काढून ते मदत साह्य जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावे या आदेशानुसार नायगावाचे तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे व प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत सुगावे व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांकडे साकडे घातले असता व्यापाऱ्यांनी मदत कार्यास चांगलाच प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला आहे.
याप्रसंगी पूरग्रस्तांच्या मदत फेरी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत सुगावे,तालुकाध्यक्ष युवक अध्यक्ष अमोल जाधव,मागासवर्गीय तालुकाध्यक्ष केरबा रावते,जिल्हा उपाध्यक्ष मारोती कदम,विश्वनाथ बडूरे,दादाराव रोडे,साहेबराव कदम,धम्मदीप भद्रे,कैलास भालेराव, गजनान पवार, रणजित गोरे,कैलास जाधव,माधव बेंद्रीकर,उमाजी वाघमारे, माधवराव कोरे,राजू सुर्यवंशी, सुधाकर कोकणे,श्याम चौडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परिश्रम घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here