• Home
  • 🛑 या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण….! स्मार्ट सरपंचाचे गाव…. या गावची यशोगाथा 🛑

🛑 या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण….! स्मार्ट सरपंचाचे गाव…. या गावची यशोगाथा 🛑

🛑 या गावात मिळते मोफत पाणी आणि मोफत दळण….! स्मार्ट सरपंचाचे गाव…. या गावची यशोगाथा 🛑
✍️ भंडारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पालडोंगरी/भंडारा :⭕”गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा” असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचे हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील पालडोंगरी या छोट्याशा गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे.

पालडोंगरीच्या सरपंच सुरेखा खराबे यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्‍वास कृतीत आणण्यासाठी ग्रामसेवक कु. भारती मुरकुटे, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगती कडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या राष्ट्रीय ग्राम गौरव पुरस्काराने गावाची राष्ट्रीय स्तरावरओळख निर्माण केली आहे.

मोहाडी तालुक्‍यातील पालडोंगरी ग्रामपंचायतीने गावपातळीवरील वैयक्तिक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ग्रामविकासाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी, पारदर्शक कामकाज यामुळे ग्रामपंचायतीने प्रत्येक कामात यश संपादन केले आहे.

ग्रामपंचायत आयएसओ असून नवनिर्मित इमारत उभारण्यात आली आहे. ग्राम पंचायत कार्यालयात अग्निशमन यंत्र प्रथमोपचारपेटी आपत्कालीन संपर्क क्रमांकाचे सूचना फलक, पिण्यासाठी आरओचे शुद्ध पाणी, भूमीगत गटारे, जादुई शोष खड्डे, कचऱ्याचे ओला, सुका वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापण, डिजिटल अंगणवाडी, डिजिटल प्राथमिक शाळा या सर्व सुविधांमुळे ग्राम पंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वाचनालय, स्मशानभूमीमध्ये उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध असून या सर्वांना आयएसओ मानांकन मिळाले आहे.

स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरव

2014 पासून तत्कालीन सरपंच दिनेश खंडाते, दृढ निश्‍चयी उपसरपंच प्रकाश खराबे यांच्या कार्यकाळात गावाने कात टाकली. हळूहळू परिवर्तनाची कास धरीत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये जनतेतून थेट सरपंचपदी सुरेखा प्रकाश खराबे निवडून आल्या. गाव विकास करण्याचे ध्येय स्पष्ट झाले. 2016 ला सचिव भारती मुरकुटे यांनी 1 ते 33 नमुने ऑनलाइन करून संगणकीकृत दाखले व प्रमाणपत्र देणे सुरू केले आणि सर्व प्रथम तालुका स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. ही फक्त सुरुवात होती. मग गावाने मागे वळून बघितलेच नाही. पुढे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वछता अभियानात सलग तीन वर्ष तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोकसहभागातून गावातील प्रवेशद्वार, मग्रारोहयो योजनेतून रोपवाटिका, सौंदर्यीकरण करून उद्यानाची निर्मिती करण्यात आला. उद्यानाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची नावे देण्यात आली.

⭕पुरस्कार निधीचा सदुपयोग⭕

पुरस्काराच्या निधीतून सार्वजनिक ठिकाणी शौचालय व स्वछतागृह तयार करण्यात आले. गावात एलइडी दिवे, सीसीटीव्ही. कॅमेरे, स्मशानभूमीत, बालोद्यानात खेळणी लावण्यात आली. किशोरवयीन मुली व महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने अंगणवाडी केंद्रात सॅनिटरी नॅपकिन व व्हेडिंग मशीन लावली. अंगणवाडीच्या व प्राथमिक शाळेतील मुलांना ड्रेस कोड लागू केला.

⭕मोफत पाणी, मोफत दळण⭕

गावातील नागरिकांचे कर वसुलीत सहकार्य मिळावे म्हणून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल व मे महिन्यांत शंभर टक्‍के कर भरणाऱ्या कुटुंबाना वर्षभर मोफत दळण व दररोज 20 लिटर आरओचे शुद्ध पाणी दिले जाते. 100 टक्के वसुली करणारी पालडोंगरी ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे .विविध धाडसी उपक्रम राबवून ग्रामपंचायतीने नावलौकिक मिळविला आहे.

लोकसहभागातून विकास

गावाने लोक सहभागातून कात टाकली असून इतरांसाठी विकासाची प्रेरणा देणारे मॉडेल ठरले आहे. येथे भेट देणारे लोक येथील कामे पाहून भारावून जातात. रोजगार हमी योजनेतून कुटुंबाना 100 दिवस काम उपलब्ध करून देणारी ही तालुक्‍यातील एकमेव ग्राम पंचायत आहे. गावावर निसर्गाने मुक्तपणे उधळण केली असून काशी देवस्थानाला ब दर्जाचे तीर्थस्थळ म्हणून घोषणा करण्यात आली. पालडोंगरी गावात प्रत्येक घरी शौचालये असून गाव 100 टक्के हागणदारीमुक्त आहे. गावात दारूबंदी व प्लॅस्टिकबंदी असून तसा ठराव ग्रामपंचायतीने पारीत केला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment