Home नाशिक निराधारांचे आधारस्तंभ नागापुरचे सरपंच राजाभाऊ पवार

निराधारांचे आधारस्तंभ नागापुरचे सरपंच राजाभाऊ पवार

166
0

आशाताई बच्छाव

20230529_073211-BlendCollage.jpg

निराधारांचे आधारस्तंभ नागापुरचे सरपंच राजाभाऊ पवार

स्वमानधनातून ८२ वर्षाच्या वृध्द महिलेस दिले बांधुन शौचालय —

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

मनमाड -नांदगाव रोडवर असलेल्या व मनमाड जवळून अगदी जवळ असलेल्या नागपूर या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांच्या पवित्र चरकमलाने पुण्य पावन झालेल्या नागापूर ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच राजाभाऊ पवार यांनी आपणही समाजाचे देणे लागतो ,आपल्या हातूनही काहीतरी समाजकार्य घडावं, निराधार ,अपंग व अबलांना आपल्या कार्यातून मदत करता यावी या उद्देशाने प्रेरित होऊन ते सातत्याने समाजकार्य कर असतात.जनतेतून थेट सरपंच म्हणून निवडून आलेले नागापुरचे सरपंच राजाभाऊ सयाजी पवार यांनी सरपंच म्हणून मिळणाऱ्या मानधनातून गावातील एका निराधार व ८२ वर्षे वयाच्या वृध्द महिलेस शौचालय बांधून दिले व माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
सविस्तर वृत्त असे की, नागपूर ता नांदगाव येथील रहिवासी महिला सोन्याबाई दखने जवळपास ८२ वर्षाच्या एका वृद्ध महिलेला कोणीही आधार नाही. महिलेस तब्येतीच्या व वयाच्या कारणामुळे स्वच्छतागृहात जाता येत नव्हते ही बाब राजाभाऊ पवार यांना महिला सदस्य सौ. पुष्पाताई पवार यांनी निदर्शनास आणून दिली. सरपंच पवार यांनी आपल्या चार महिन्यांच्या स्वतःच्या पगारातून त्या महिलेला एक शौचालय बांधून दिले. या बद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतूक केले आहे. तळागाळातल्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत लक्ष देण्याची सुरुवातीपासूनची त्यांची तळमळ आहे त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे सामाजिक कार्या बरोबर एक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांनी आजवर सातत्याने केले आहे. आज हा कार्यक्रम होत असताना उपस्थित सर्वच भावुक झाले होते. याप्रसंगी उपसरपंच केसरताई पवार, सदस्य पुष्पाताई पवार, सदस्य विद्याताई देवरे, सदस्य वाल्हाताई मोरे, रवी नगे, निलेश पवार, रतन खुरसने, प्रकाश जिरे व ग्रामसेवक दिलीप निकम उपस्थित होते.

@ महाराष्ट्रातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नावाजलेली ग्रामपंचायत म्हणजे नागापूर तालुका नांदगाव ! तेल कंपन्यांण्यामुळे या ग्रामपंचायतीला चांगलं उत्पन्न मिळत असल्यामुळे ही ग्रामपंचायतीने जिल्हाभरात आपला
नावलौकिक यापूर्वी वाढवला आहे. वीस वर्षापूर्वी याच ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून श्री. पवार यांनी कार्यभार स्वीकारला व आपल्या अभ्यासाच्या व बुद्धीच्या जोरावर तेल कंपन्यांकडून मोठा कर ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचे काम राजेंद्र पवार यांनी केले त्यांच्या कार्यकाळात राज्याचा निर्मल ग्राम पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार असे देश पातळीवरचे पुरस्कार मिळून नागापुरचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवलं त्यांनंतर राजेंद्र पवार जिल्हा परिषद सदस्य, गटनेते झाले. मध्यंतरीच्या वीस वर्षाच्या काळानंतर पुन्हा जनतेतून थेट सरपंच म्हणून त्यांची निवड झाली आणि शेवटी काम करणारा माणूस म्हटले की त्याला कामाशिवाय करमत नाही काम म्हटलं की आपोआप अंगात ऊर्जा निर्माण होते. जनहिताची व विकासाचे काम करण्याची तळमळ त्यांच्यात आहे.

सौ पुष्पाताई पवार ग्रां पं सदस्य नागापूर (नांदगाव)

Previous articleदेगलुर शहर जिल्हा घोषित करण्यात यावा देगलूर तहसील कार्यालया मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे मागणी
Next articleवनमजूर , वनरक्षक व वनपाल यांच्या बैठकीत मागण्या मान्य.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here