Home बुलढाणा भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोडवर पलटया

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोडवर पलटया

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0006.jpg

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोडवर पलटया
(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                           शेगाव वरून परत येत असणारे खाली ट्राली असलेले तरोडा-डी येथील ट्रक्टर ड्राइव्हर यांचा चा तोल सुटुन ट्रक्टर पलटी झाल्याची घटना काल दुपारी 3वाजता च्या सुमारास दिनांक 18 जुन ला घडली.
ट्रक्टर मध्ये विलास रमेश वानखेडे वय 40 वर्ष , ड्राईव्हर गणेश रामचंद्र भगेवार वय 26 वर्ष, विलास विष्णु बघे वय 50 वर्षे हे तीन जण कामावरून परत येत असताना ट्रक्टर मध्ये बसून येत होते
ट्रॅक्टरचा वेग आवरत अचानक ब्रेक केल्यामुळे ट्रक्टर पलटी झाले, योगायोगाणे वरवट बकाल कडुन रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथुन उमरा येथील सागर भोंडे नामक रुग्ण नातेवाइक सह येत होती घटनास्थळी थांबुन रुग्णवाहिका ड्राईव्हर यांनी आत असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून या तिघांना आत घेन्याची विनंति करुन तिघांना शेगांव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव येथे प्राथमिक उपचारासाठी आणले उपचार करताना ड्राईव्हर गणेश यांचे दोन्ही पाय आणि विलास वानखेडे यांचे दोन्ही हात फॅक्चर झाले असुन विलास बघे यांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर जबर मार लागलेला असल्याची माहीती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुऱ्हाडे सर यांच्या कडून मिळाली आहे पुढील उपचाराकरिता तिघांना अकोला रेफर करण्यात आले आहे
सदर ट्रक्टर हे अळसना येथे कामावर गेलेले होते काम पूर्ण झाल्यावर घराकडे परत येत असताना शेगांव वरून 4 किलोमीटरवर अंतरावर कालखेड फाट्या च्या जवळपास ट्रक्टर वेगात असल्यामुळे ब्रेक करत असताना ड्राईव्हर यांचा समतोल सुटुन ट्रक्टर च्या दोन्हीं ब्रेक चा वापर न झाल्यामुळे सिंगल ब्रेक लावल्याने सदर घटना घडली अशी माहिती घटना स्तळी असलेल्या लोकांकडून प्राप्त झाली

Previous articleगुरव समाज खामगाव वतीने गुरव समाज सामुहीक उपनयन मौन्ज सोहळा थाटामाटात साजरा
Next articleनावाजलेला गुरांचा बाजार भरणाऱ्या वरवट बकाल येथील ठिकाणची दिशा बद्दलविण्याचे निर्देश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here