Home बुलढाणा गुरव समाज खामगाव वतीने गुरव समाज सामुहीक उपनयन मौन्ज सोहळा थाटामाटात साजरा

गुरव समाज खामगाव वतीने गुरव समाज सामुहीक उपनयन मौन्ज सोहळा थाटामाटात साजरा

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0012.jpg

गुरव समाज खामगाव वतीने गुरव समाज सामुहीक उपनयन मौन्ज सोहळा थाटामाटात साजरा             (रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

खामगाव येथिल श्री चोपडे यांच्या मळ्यात श्रीधर महाराज संस्थान वारकरी भवन,घाटपूरी रोड येथे दिनांक 16जुन 2022 ला सामुहिक पद्धतींत 22 बटूंवर उपनयन मौन्ज संस्कार सोहळा गुरव समाज खामगाव यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला असंख्य समाज बांधव, भव्यदिव्य पुजा अर्चना,वेद पुराण अनुसार थाटामाटात सोहळा सर्व समाज बांधवांच्या उपस्थित झाला समाज बांधवांकरिता सर्व सोयी सुविधांची सहभोजन व्यवस्था निःशुल्क उपक्रम राबविण्यात आला सदर सोहळ्यात विधी पुर्व हळदिच्या कार्यक्रम करिता अगोदरच्या दिवसापासून विधी सुरू होता विधी सामूहिक 22 बटूनची हनुमान मंदिरापर्यंत वाजागाजा,नाचगाण्यांसह जल्होशात मिरवणूक काढण्यात आली.हा कार्यक्रम खामगाव येथे पहिल्यांदा घेण्यात आला कार्यक्रमाची सांगता वेगवेगळ्या ठिकाण वरून आलेल्या 22 बटूनच्या आई वडील, गुरुजन, आणि आलेल्या शेकडो पाहुणे मंडळींनी गुरव समाज खामगाव करांना धन्यवाद व्यक्त केले
सदर कार्यक्रमाचे नियोजन खामगाव येथील संजय पारखेडकर,प्रशांत मेंढुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले असुन आयोजण सर्व समाज बांधव खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले होते कार्यक्रमाचे औचित्य साधुन या कार्यक्रमात कोणत्याही प्रकाचे स्टेज,विशेष पाहुणे सत्कार समारंभ, भाषणे,विडिओ शुटिंग द्वारे कोणालाही कोणत्याही प्रकारचे श्रेय घेणे हा उद्देश न बाळगता सहभागी झालेल्या बटु व त्यांच्या आई वडिलांना उपनयन संस्कार मार्गदर्शन आणि आलेल्या पाहूणे मंडळींचा आशीर्वाद घेणे ह्या गोष्टींवर आयोजित केल्या गेला होता हे मात्र विशेष !!
येथील दिपकराव राजनकर, कैलासराव पारखेडकर,गजानन राव खंडार तसेच श्री आळेकर,श्री कथलकर,श्री घोरपडे,श्री दांडगे,श्री शेलकर,श्री वाघमारे,श्री तांबोळी,श्री बाळापूरे,श्री पंडित, श्री जराड,श्री शिंदे तसेच असंख्य खामगाव समाजबांधव सहपरिवार यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती

Previous articleइयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन
Next articleभरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोडवर पलटया
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here