Home रत्नागिरी जेष्ठ नागरिकांसाठी एसटीला अतिरिक्त पायरी बसवा : युवा सेनेची मागणी

जेष्ठ नागरिकांसाठी एसटीला अतिरिक्त पायरी बसवा : युवा सेनेची मागणी

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0015.jpg

जेष्ठ नागरिकांसाठी एसटीला अतिरिक्त पायरी बसवा : युवा सेनेची मागणी

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) एसटी विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेसना असलेल्या पायऱ्या रस्त्यापासून जास्त उंचीवर असल्याने जेष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांना अनेकवेळा रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. याचा आर्थिक भुर्दंड जेष्ठ नागरिकांना बसत असल्याने बसेसना अतिरिक्त पायरी लावण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. आज शुक्रवारी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांनी याबाबतचे लेखी निवेदन एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले.

रत्नागिरी शहर वाहतुकीच्या बसेस शहरासह ग्रामीण भागात प्रवास करतात. ग्रामीण भागातून अनेक जेष्ठ नागरिक कामानिमित्त शहरात येत असतात. मात्र शहर वाहतुकीच्या बसेसची पहिली पायरी रस्त्यापासून जास्त उंचावर असल्याने जेष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे अशक्य होते. त्यामुळे त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. जेष्ठ नागरिकांचा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी एसटी बसेसना रस्त्यापासून कमी उंचीवर अतिरिक्त पायरी बसविण्यात यावी अशी मागणी युवा सेनेने केली आहे. शुक्रवारी एसटीच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, आशिष चव्हाण, दुर्गेश साळवी, निखिल बने, पारस पाटिल, तरुण शिवलकर, धनराज चव्हाण, हितेश बिर्जे, पारस साखरे, ओमकार पाटील, ओम सावंत आदी उपस्थित होते.

Previous articleशेतात राब-राब राबणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर कुटूंब सदस्य बैलाची काथरगावात तेरवी
Next articleआंबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आठ दिवसात घेणार बैठक : उदय सामंत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here