Home रत्नागिरी आंबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आठ दिवसात घेणार बैठक : उदय सामंत

आंबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आठ दिवसात घेणार बैठक : उदय सामंत

136

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0016.jpg

आंबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आठ दिवसात घेणार बैठक : उदय सामंत                        रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या आठ दिवसात मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आंबा बागायतदार यांच्यासाठी मंत्रालयात सकारात्मक बैठक कदाचित होऊ शकली नसेल. आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. कोकणातील आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत – जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविणे हा युती सरकारचा प्राधान्यक्रम आहे, असे यावेळी श्री.सामंत म्हणाले.

श्री.सामंत म्हणाले, पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आंबा बागायतदार यांचे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा मला विश्वास आहे. युती सरकार हे समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेलं आपलं सरकार आहे.

Previous articleजेष्ठ नागरिकांसाठी एसटीला अतिरिक्त पायरी बसवा : युवा सेनेची मागणी
Next articleभास्कर जाधवांची घसरली जीभ; राज्यपालांना म्हटलं ‘घरगडी’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.