Home बुलढाणा शेतात राब-राब राबणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर कुटूंब सदस्य बैलाची काथरगावात तेरवी

शेतात राब-राब राबणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर कुटूंब सदस्य बैलाची काथरगावात तेरवी

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0008.jpg

शेतात राब-राब राबणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर कुटूंब सदस्य बैलाची काथरगावात तेरवी

युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी:-रवि शिरस्कार

संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे आज दि ४ ऑगष्ट रोजी गणेश कैलास टापरे ह्यांनी त्यांच्या कडे गेल्या बावीस वर्षा पासुन असलेल्या एका बैलाचा बारा दिवसा पूर्वी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूबां मध्ये दुखःचे सावट पसरले होते . लहान पणा पासुनच सबधीत बैलाची कुटूबातील सदस्या प्रमाणे देखभाल करीत तब्बल बावीस वर्ष ह्या बैलाने त्यांच्या शेती कामामध्ये भरिव मदत केली होती त्याच्या मृत्युमुळे टापरे परिवारात एक प्रकारे पोकळी निर्माण झाली होती . त्यामुळे ह्या बैलाची उत्तर क्रिया कुटूंबातील एका सदस्या प्रमाणे करुन टापरे परिवाराने एक नवा पायंडा घातला आहे .
बावीस वर्षापूर्वी गणेश टापरे यांच्या गावालगतच्या शेतात राजस्थानी गवळी लोकांचे एक खिल्लार आले होते आठवडा भर ते टापरे यांच्या शेतात मुक्कामी होते दरम्यानच्या काळात एका गाईला दोन वासरांना (गोर्हा ) जन्म दिला होता त्या पैकी एक वासरु (गोरा ) संबधीत खिलार मालकाने टापरे यांना दिला होता तेव्हा पासुन टापरे यांनी त्याची घरातील एका सदस्या प्रमाणे निगा घेतली होती . आपल्या शेतातील नांगर वखरणी पेरणी करण्या साठी तब्बल पंधरा वर्षा पर्यंत वापरले होते त्याच्या पायगुणा मुळे टापरे परिवाराला आज रोजी चांगले दिवस आले आहे असे असतांना मागील बारा दिवसा पूर्वी ह्या बैलाचा अकस्मात मृत्यू झाल्याने ह्या परिवारावर शोक कडा पसरली होती .
आपल्या धन्या प्रती कर्तव्यदक्ष राहलेल्या ह्या बैला प्रती आदर भाव ठेऊन त्याची तेरवी आज रोजी संपन्न झाली ह्या तेरवीच्या कार्यक्रमाला शेकडो शेतकर्‍याची उपस्तीती होती ह्या वेळी उपस्थीताना टापरे परीवारा कडून मिष्ठान्न भोजन देण्यात आले भावुक वातावरणात सपन्न झालेल्या तेरवीची खमंग चर्चा तालुका भर होत आहे.

Previous articleभोकर चे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे साहेब यांची बदली
Next articleजेष्ठ नागरिकांसाठी एसटीला अतिरिक्त पायरी बसवा : युवा सेनेची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here