Home Breaking News अहमदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल..

अहमदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल..

109
0

अहमदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल..
“तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.”

अहमदनगर : (प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
महाराष्ट्रातील अहमदनगर
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास वाघ सध्या सुट्टीवर आहे. २०१९मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणीशी विकास वाघ याने ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. ही माझी मुलगी आहे असे सांगत जवळीक वाढवली आणि नंतर घरी जाऊन तिथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. याबाबत पीडित तरूणीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ‘ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील’ अशी धमकी दिली. त्यानंतर विकास वाघ याने पीडितेवर वेळोवेळी कधी हॉटेल तर कधी कोतवाली पोलीस निरीक्षकाच्या निवासस्थानी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने २६ सप्टेंबर २०१९ रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गर्भपात केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब विकास वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली. तसंच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२० रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून विकास वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous article*ऑरेंज आर्मीचा पहिला विजय*
Next articleचौकटपाडेत आमदारांच्या कामांचे भुमिपुजन संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here